गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि लोकनेत्या जे. जयललिता यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


गरिबांच्या कल्याणासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेद्वारे, जयललिता यांनी तामिळनाडूच्या विकासाला आकार दिला.

जयललिता यांनी शासनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची प्रभावी अंमलबजावणी केली

जनसेवेसाठी त्यांचे समर्पण नेहमीच प्रेरणादायी राहिल

Posted On: 24 FEB 2026 10:14AM by PIB Mumbai

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि लोकनेत्या जे. जयललिता यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

'एक्स' वरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 

"तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि लोकनेत्या जे. जयललिता जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. गरिबांच्या कल्याणासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेद्वारे, त्यांनी तामिळनाडूच्या विकासाला आकार दिला आणि शासनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल याची खात्री केली. सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे समर्पण नेहमीच प्रेरणादायी राहील.”

*** 

NitinFulluke / ShraddhaMukhedkar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232016) अभ्यागत कक्ष : 21