लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

वैश्विक लोकशाही संबंधांना बळकटी देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी 60 हून अधिक देशांबरोबर संसदीय मैत्री गट केले स्थापन

Posted On: 23 FEB 2026 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2026

जगाबरोबर भारताचे आंतर-संसदीय संबंध वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 60 हून अधिक देशांसोबत संसदीय मैत्री गट स्थापन केले.  खंडांमधील इतर देशांच्या कायदेमंडळांशी संवाद साधला जावा आणि त्यांच्याबरोबर देवाणघेवाण वाढविणे आणि पारंपरिक राजनैतिकतेला शाश्वत संसदीय संवादासह पूरक बनवण्यासाठी हे पाऊल उचण्‍यासाठी भारतीय संसदेच्यावतीने  केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न प्रतिबिंबित करते.

या प्रयत्नांमध्ये ज्या  देशांबरोबर असे  संसदीय मैत्री गट स्थापन केले गेले आहेत त्यांच्यापैकी  काही देशांमध्ये श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपीय संघ संसद, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जपान, इटली, ओमान, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि युएई- संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे.

या उपक्रमामागील कल्पना म्हणजे कायदेकर्त्यांना परदेशातील त्यांच्या समकक्षांशी थेट बोलता यावे, कायदेविषयक अनुभव सामायिक करता यावा आणि नियमित सहभागाद्वारे विश्वास निर्माण करता यावा आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत केले जावेत आणि अधिक परस्पर समजुतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करता यावी. संसदीय प्रक्रियेपलीकडे, या गटांकडून व्यापार, तंत्रज्ञान, सामाजिक धोरण, संस्कृती आणि आज लोकशाहीसमोरील जागतिक आव्हाने याविषयी  सुलभ संवाद साधला जााणे अपेक्षित आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताची जागतिक स्थिती मजबूत करण्यात संसदीय राजनैतिकतेची भूमिका सातत्याने अधोरेखित केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, संसदेने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अधिक सक्रिय भूमिका घेतली आहे, भारताला केवळ एक राजकीय शक्ती म्हणूनच नाही,  तर भारत सर्वांचे  मत ऐकून घेतो, त्यामध्‍ये सहभागी होतो, आणि सहकार्य करण्यास तयारही असतो, तसेच  आत्मविश्वासपूर्ण  आणि परिपक्व लोकशाही म्हणून देशाची प्रतिमा सादर करण्‍यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली.

संसद ते संसद आणि लोकांमधील संबंधांना प्राधान्य देऊन, हा उपक्रम परदेशी संसदांसाठी  अधिक सहभागी दृष्टिकोन दर्शवितो. मैत्री गट संवाद, अभ्यास भेटी आणि संयुक्त चर्चेद्वारे संरचित देवाणघेवाण सक्षम होवू शकेल.  लोकशाही मूल्यांमध्ये रुजलेले दीर्घकालीन सहकार्य टिकवून ठेवण्यास मदत करतील. अशा प्रकारे भारतीय संसद इतर राष्ट्रांमध्ये  सेतू म्हणून आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे जिवंत प्रतिबिंब म्हणून आपली भूमिका मजबूत करेल.


सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2231863) अभ्यागत कक्ष : 10