पंतप्रधान कार्यालय
एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांशी भेट
Posted On:
20 FEB 2026 9:52PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव (यूएनएसजी) अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.
एआयचे लोकशाहीकरण आणि ते मानवकेंद्रित करण्याच्या उद्देशाने एआय इम्पॅक्ट समिट आयोजित केल्याबद्दल यूएनएसजीने पंतप्रधानांचे अभिनंदन केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेवरील स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनेल तयार करण्यासाठी यूएनएसजीच्या प्रयत्नांचे आणि एआयसाठी विकसनशील देशांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी एआयसाठी मानव केंद्रित दृष्टिकोन आणि विकासासाठी उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानाची भूमिका यांचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी बहुध्रुवीय जगावर समकालीन वास्तवांचे प्रतिबिंब उमटवणाऱ्या विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता देखील अधोरेखित केली.
पंतप्रधान मोदींनी यूएनएसजी गुटेरेस यांना त्यांच्या उर्वरित कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
***
हर्षल आकुडे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2231157)
अभ्यागत कक्ष : 3