पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा 

प्रविष्टि तिथि: 20 FEB 2026 9:33AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

दयाळूपणा आणि करुणेच्या मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या मिझोरामच्या मजबूत सामुदायिक भावनेचे आणि दयाळू नागरिकांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा.

मिझोराम हे त्याच्या आकर्षक नैसर्गिक सौंदर्य आणि चिरस्थायी सांस्कृतिक परंपरांसाठी सर्वदूर ओळखले जाते. त्याची मजबूत सामुदायिक भावना आणि विनम्र नागरिक दयाळूपणा आणि करुणेच्या मूल्यांचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. परंपरा, संगीत आणि दैनंदिन जीवनातील इतर पैलूंद्वारे व्यक्त होणारा समृद्ध मिझो वारसा खूप प्रेरणादायी आहे.

मिझोराम विकासाच्या मार्गावर पुढे चालत राहो आणि भविष्यात नवीन टप्पे गाठो.”

***

नेहा कुलकर्णी/ श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2230864) आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam