गृह मंत्रालय
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांना केले अभिवादन.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण वयातच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर धर्मध्वजाचे रक्षण करण्यासाठी ते कटिबद्ध राहिले.
शिवाजी महाराजांनी देशाच्या प्रत्येक भागात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा चिरंतन राखण्याची आणि त्यासाठी प्राणार्पण करण्याची जाज्वल्य आकांक्षा जागृत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला संघटित केले आणि एक विशाल सैन्य उभारले; ज्याचा एकमेव उद्देश राष्ट्र आणि त्याची संस्कृती यांचे रक्षण करणे हा होता.
त्यांच्यासारखी दुर्दम्य इच्छाशक्ती, अदम्य धैर्य आणि अकल्पनीय रणनीती इतिहासात क्वचित पाहायला मिळते.
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2026 11:12AM by PIB Mumbai
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केले आहे
आपल्या एक्स' वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत, की छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुण वयातच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि आयुष्यभर धर्मसंस्थापनाचे रक्षण करण्यासाठी ते वचनबद्ध राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्राच्या प्रत्येक भागात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा चिरंतन ठेवण्यासाठी जाज्वल्य इच्छाशक्ती जागृत केली, असे शहा यांनी अधोरेखित केले. शिवाजी महाराजांनी समाजाच्या प्रत्येक घटकाला संघटित केले आणि एक विशाल सेना उभारली ज्याचा एकमेव उद्देश राष्ट्र आणि त्याच्या संस्कृतीचे रक्षण करणे हा होता, असे ही त्यांनी पुढे नमूद केले. महाराजांची दुर्दम्य इच्छाशक्ती, अदम्य धैर्य आणि अकल्पनीय रणनीती इतिहासात क्वचितच पाहायला मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.
***
Nehakulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2230146)
आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam