माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय पॅव्हेलियन भारताचे प्रमुख एआय इनोव्हेशन वर्कस्पेस म्हणून उदयास आले आहे
Posted On:
17 FEB 2026 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरची कल्पना केवळ एक प्रदर्शन मंडप म्हणून नव्हे तर पूर्णपणे कार्यरत,व्यावहारिक इनोव्हेशन वर्कस्पेस म्हणून करण्यात आली आहे. एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) परिसंस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे वास्तविक, क्रांतिकारी अनुप्रयोग प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केले आहे, हा कॉर्नर अभ्यागतांना एक खिळवून ठेवणारा आणि सहभागी झाल्याचा अनुभव देतो.
हे ठिकाण वेव्हज आणि त्याचे प्रमुख स्तंभ : वेव्हएक्स, वेव्हज बाजार आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसचा एक धोरणात्मक विस्तार आहे , ज्यामध्ये वेव्हएक्स स्टार्टअप्स प्रभावी प्रात्यक्षिके आणि थेट तैनातीद्वारे केंद्रस्थानी आहेत.
उदयोन्मुख नवोन्मेषकांसह, अॅडोब, नेटफ्लिक्स, सोनी, कलेक्टिव्ह, इनशॉर्ट्स, कुकुएफएम आणि व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल सारख्या आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कंपन्या अत्याधुनिक एआय टूल्स आणि परिवर्तनकारी मीडिया तंत्रज्ञान प्रदर्शन करतील.

प्रमुख अनुभव क्षेत्रे
एआय गेमिंग लॅब
अभ्यागतांनी आज वास्तविक वेळेत एआय-संचालित गेम डेव्हलपमेंटचा अनुभव घेतला, संकल्पना निर्मितीपासून ते प्लेएबल प्रोटोटाइपपर्यंत आणि परस्परसंवादी गेमिंग लॅब वातावरणात एआय-बिल्ट व्हिडिओ गेमसह सहभागी झाले. एआय गेमिंग लॅब पुढील काही दिवस थेट प्रात्यक्षिके आणि परस्परसंवादी सहभाग देत राहणार आहे.
एआय कंटेंट क्रिएशन लॅब (अॅडोबचे पाठबळ )
लाइव्ह स्टुडिओ वातावरणात एआयच्या मदतीने चित्रपट निर्मिती दाखवण्यात आली , जिथे संकेत वास्तविक वेळेत स्क्रिप्ट, व्हिज्युअल आणि सिनेमॅटिक सीक्वेन्समध्ये रूपांतरित झाले , ज्यामुळे डिजिटल स्टोरीटेलिंग वर्कफ्लो पुनर्भाषित झाला.ही लॅब येणाऱ्या काळातही अभ्यागतांसाठी एआय-सक्षम सर्जनशील प्रक्रिया दाखवणे सुरूच ठेवणार आहे.
एआय-सक्षम न्यूजरूम
एडब्ल्यूएस, भारतजेन, इंडिया टुडे आणि कलासेतू स्टार्टअप्सद्वारे संचालित , न्यूजरूम इन्स्टॉलेशनमध्ये एआय एजंट्स ऑटोमेटेड कंटेंट जनरेशनपासून ते व्हॉइस-कमांड-आधारित संपादकीय व्यवस्थापनापर्यंत,न्यूजरूम ऑपरेशन्स कसे सुव्यवस्थित करतात हे दाखवले गेले, ज्यामुळे मीडिया कामकाजाचे भविष्य बदलते.हे इन्स्टॉलेशन सुरूच राहील आणि शिखर परिषदेच्या पुढील दिवसांमध्ये प्रात्यक्षिके दाखवणे सुरू ठेवेल.
नारद मुनी इंटरॅक्टिव्ह इन्स्टॉलेशन
पौराणिक संदेशवाहकापासून प्रेरित होऊन, या इमर्सिव्ह इन्स्टॉलेशनने दाखवले की एआय-संचालित लार्ज लँग्वेज मॉडेल्स वास्तविक जगातील प्रश्नांना गतिमान, संवादात्मक वापरकर्त्याच्या अनुभवांमध्ये कसे रूपांतरित करतात,यातून परस्परसंवादी बुद्धिमत्तेची शक्ती दाखवली आहे. येत्या काळातही हा इंटरॅक्टिव्ह अनुभव अभ्यागतांना खिळवून ठेवेल.

एआय थिएटर
या समर्पित सिनेमॅटिक स्पेसमध्ये एनएफडीसी, एलटीआयमाइंडट्री आणि अॅडोब यांनी तयार केलेले सुमारे 150 एआय-जनरेटेड चित्रपट दाखवले गेले, ज्यामुळे अभ्यागतांना एआय-संचालित चित्रपट निर्मितीच्या कलात्मक आणि तांत्रिक उत्क्रांतीचे साक्षीदार बनण्याची संधी मिळाली. पुढील काही दिवस पॅव्हेलियनमध्ये स्क्रीनिंग सुरू राहतील.
युवरस्टोरी लाउंज
आज लाउंजमध्ये एआय इकोसिस्टममधील नेत्यांसह अनौपचारिक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. युवरस्टोरीच्या श्रद्धा शर्मा यांनी या सत्रांचे संचालन केले, ज्यामध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील संवादाला चलन मिळाली.लाउंज पुढील काही दिवस चर्चा आणि परस्परसंवादी सत्रांचे आयोजन सुरूच ठेवणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दालनातील प्रमुख बूथ वैशिष्ट्ये
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पॅव्हेलियन मध्ये आघाडीच्या जागतिक आणि भारतीय नवोन्मेषकर्मींनी आधुनिक युगातील ए आय ऍप्लिकेशन्सचे सादरीकरण केले यामध्ये चित्रपटनिर्मिती, प्रसारण, भाषिक तंत्रज्ञान, शिक्षण आणि डिजिटल कथाकथन यांचा समावेश होता.
·इंडिया फिल्म प्रोजेक्ट सारख्या उपक्रमाबरोबर सहकार्य करुन अॅडोब कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणित चित्रपट आणि थेट एआय-फर्स्ट सर्जनशील कार्यप्रवाह प्रदर्शित करून अॅडोब चित्रपट निर्मितीला गती देत आहे.
·भारतजेन व्हिडिओ आणि ऑडिओमधील "डार्क डेटा" शोधता येणाऱ्या, परस्परसंवादी मालमत्तेत रूपांतरित करण्यासाठी मल्टीमोडल आरएजी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करत आहे.
·सोनी रिसर्च इंडिया टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी एआय-चालित भाषांतर, डबिंग, फेस आणि व्हॉइस री-एजिंग आणि अॅक्सेसिबिलिटी सोल्यूशन्स सादर करत आहे.
·सर्वम व्हॉइस क्लोनिंग, लाईव्ह स्पीच-टू-टेक्स्ट आणि रिअल-टाइम लँग्वेज एआय टूल्सद्वारे बहुभाषिक एआय परस्परसंवाद सक्षम करत आहे.
·अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस “एजंटिक ए आय असिस्टेड न्यूज रूम” प्रदर्शित करत आहे, यामध्ये हॅंड्स-फ्री आणि ए आय -सक्षम ब्रॉडकास्ट उत्पादनाचा वापर करुन स्थानिक किंवा अगदी जवळच्या समुदायाशी संबंधित बातम्यांचे प्रसारण केले जाते.
·व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल कमीत कमी हार्डवेअर वापरून एआय-आधारित मार्कर-लेस मोशन कॅप्चर वर्कफ्लोचे प्रात्यक्षिक करत आहे.
· गॅलेरी 5 (कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्क) मोठ्या प्रमाणात पौराणिक आणि नाट्य प्रकल्पांना चालना देणारे एआय-नेटिव्ह सिनेमॅटिक प्रोडक्शन प्लॅटफॉर्म सादर करत आहे.
·कुकू एफएम भारतातील एआय-चालित मायक्रोड्रामाचा पहिला संग्रह लाँच करत आहे, जो तळागाळातील डिजिटल स्टोरीटेलिंग नवोपक्रमावर प्रकाश टाकतो.
·प्रिझमिक्स जनरेटिव्ह एआयला व्हीएफएक्स आणि पारंपरिक माध्यमांसह एकत्रित करुन त्या माध्यमातून कथा-चालित आशय निर्मिती करणे सुलभ होईल.
·इनशॉर्ट्स वैयक्तिकृत आशय वितरणासह एआय-चालित बातम्यांचा सारांश प्रदर्शित करत आहे.
·इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज एआय-संलग्न सर्जनशील शिक्षणाला इमर्सिव्ह प्रोडक्शन वातावरणासह पुन्हा परिभाषित करत आहे.
एआय इमर्सिव्ह थिएटर:
यामध्ये 270-डिग्री प्रोजेक्शन आणि ए आय -चालित सिनेमॅटिक अनुभव होते, ज्यांनी आजच्या कथा सांगण्याच्या पद्धती आणि प्रेक्षकांच्या सहभागाची व्याख्या बदलली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि वेव्हज बाजार यांनी एलटीएमच्या सहकार्याने सादर केलेल्या एआय सिनेमा शोकेसमध्ये कथाकथनाचे माध्यम म्हणून एआयचा वापर करणाऱ्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात भारतातील पहिल्या सिनेमा एआय हॅकेथॉनमधील अंतिम फेरीतील कलाकारांच्या कामांसह, एआय लघुपटांचा संग्रह, कथावतार देखील सादर करण्यात आला. भारत मंडपममधील वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर येथे प्रदर्शित झालेल्या या उपक्रमाने भारताला एआय-चालित सिनेमॅटिक नवोपक्रमात आघाडीचे स्थान दिले. इमर्सिव्ह स्क्रीनिंग्स आणि शोकेस पुढील काही दिवसांपर्यंत सुरू राहतील, ज्यामुळे येथे भेट देणाऱ्यांना अत्याधुनिक ए आय -सक्षम कथा सांगण्याचा अनुभव घेण्याची आणखी संधी मिळेल.
अॅडोबवर आधारित आशय निर्मिती प्रयोगशाळा
यामध्ये आजच्या कंटेंट क्रिएटर्ससाठी डिझाइन केलेले एआय-आधारित व्हिडिओ निर्मिती वर्कफ्लो प्रदर्शित करण्यात आले, ज्यामध्ये प्रगत सर्जनशील तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. टेक्स्ट प्रॉम्प्ट, इमेजेस, ऑडिओ इनपुट आणि जनरेटिव्ह एआय टूल्स वापरून कल्पना उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओंमध्ये कशा रूपांतरित केल्या जातात हे या प्रयोगशाळेने दाखवून दिले.
क्रिएटर्सनी थेट प्रात्यक्षिकांद्वारे, व्हिडिओ, ऑडिओ आणि प्रतिमा यातील संपूर्ण एआय वर्कफ्लोचा अनुभव घेतला, ज्यात टेक्स्ट-टू-व्हिडिओ, इमेज-टू-व्हिडिओ स्टोरीटेलिंग, जनरेटिव्ह एडिट्स आणि जलद कंटेंट पुनरावृत्ती यांचा समावेश होता. या प्रदर्शनात एआयने जटिल उत्पादन प्रक्रिया कशा सोप्या केल्या, स्वयंचलित संपादन केले, दृश्ये सुधारली आणि संकल्पनेपासून अंतिम आउटपुटपर्यंत कथाकथन कसे वेगवान केले यावर प्रकाश टाकण्यात आला. एकंदरित, या अनुभवाने एआयला जलद, स्मार्ट आणि मोठ्या प्रमाणावर मल्टीमीडिया कंटेंट निर्मिती करण्याचे एक प्रभावी साधन सिद्ध केले आहे.
मीडिया लाउंज
आज YourStory च्या श्रद्धा शर्मा यांनी संस्थापक आणि विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या. सर्व सत्रे WAVES OTT वर थेट प्रक्षेपित करण्यात आली, ज्यामुळे शिखर परिषदेतील विचारमंथन आणि निष्कर्ष व्यापक स्तरावर उपलब्ध झाले. तज्ञांच्या संवादांमध्ये सार्वजनिक धोरण, प्लॅटफॉर्म इकोसिस्टम, सार्वभौम एआय क्षमता आणि डिजिटल लवचिकता यासारख्या विषयांचा समावेश होता. या सत्रात राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि KOGO सारख्या संस्थांबरोबरच कुकू एफएम, गॅरेज लॅब्स आणि ओरॅकल यांच्या परिसंस्था अनुभवांमधूनही महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मांडण्यात आली.
स्टार्टअप सादरीकरणे आणि आरोग्यसेवा, सामाजिक आव्हाने तसेच स्थानिकीकृत आशयामधील एआय ॲप्लिकेशनवरील चर्चांमधून भारतातील नवोन्मेष-आधारित प्रभाव अधोरेखित झाला.
मीडिया लाउंजमधील सत्रे पुढील काही दिवस सुरू राहणार असून अधिक संवाद, चर्चा आणि थेट सत्रांद्वारे समिटमधील महत्त्वपूर्ण विचार आणि निष्कर्ष अधिक व्यापकपणे पोहोचवण्याचा उद्देश आहे
पॅनेल चर्चा आणि मास्टरक्लासेस
भारत मंडपम येथील पॅव्हेलियनमध्ये आज मीडिया आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रातील एआय-आधारित बदलांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅनेल चर्चा आणि मास्टरक्लासेसची मालिका आयोजित करण्यात आली होती. वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरमधील चर्चेला उच्च-प्रभावी ज्ञान मंचाचे स्वरूप देण्यात आले होते, ज्यात उद्योजक, उद्यम भांडवलदार, तंत्रज्ञ, निर्माते आणि धोरणकर्ते सहभागी झाले.
या सत्रांमध्ये गेमिंग, सिनेमा, न्यूजरूम ऑटोमेशन, इंटरॅक्टिव्ह मीडिया, मुद्रीकरण मॉडेल्स आणि नैतिक एआय फ्रेमवर्कमध्ये एआयच्या भविष्याचा शोध घेण्यात आला. प्रख्यात चित्रपट निर्माते शेखर कपूर यांचे मास्टरक्लासेस आणि आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांची तंत्रज्ञान अभ्यास सत्रे आजच्या कार्यक्रमाचा भाग होती.
ही सत्रे सैद्धांतिक चर्चेपुरती मर्यादित न राहता व्यावहारिक प्रात्यक्षिके, वास्तविक-जगातील केस स्टडीज आणि थेट प्रश्नोत्तरे संवाद यामुळे ती अधिक परिणामकारक ठरली. सहभागींना एआय-संचालित मीडियाचा तात्काळ उपयोग, गुंतवणूकीची क्षमता आणि दीर्घकालीन सर्जनशील परिणाम याविषयी सखोल माहिती मिळाली.
वेव्हज पॅव्हेलियनमध्ये पुढील काही दिवस पॅनेल चर्चा आणि मास्टरक्लास सुरू राहतील, ज्यामुळे मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात एआयच्या परिवर्तनकारी भूमिकेवर अधिक सखोल विचारमंथन होणार आहे.
शैलेश पाटील/निलीमा चितळे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229396)
अभ्यागत कक्ष : 6