माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताचे एआय युग-: माहिती प्रसारण मंत्रालयाच्या दालनात सरकार, स्टार्टअप आणि निर्माते यांचा मेळा
इंडिया इम्पॅक्ट एआय शिखर परिषद 2026 मध्ये माहिती प्रसारण मंत्रालयाच्या दालनात भारताच्या एआय क्षमतांचे आणि स्टार्टअप संस्कृतीचे दर्शन
Posted On:
16 FEB 2026 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बदलत्या परिदृश्यात जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचा आवाज म्हणून भारत नावारूपाला येत असताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद -2026 मध्ये एक समर्पित दालन उभारले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या उंचावणाऱ्या क्षमता, स्टार्टअप उद्योगांची व्यापकता आणि दायित्वपूर्ण एआय-स्वीकृतीसाठी धोरण आधारित दृष्टी या मुद्द्यांवर या दालनात प्रकाश टाकण्यात आला आहे.
या दालनात वेव्हज अंतर्गत सर्जनशील व्यक्तींसाठी वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर तयार करण्यात आला असून तो प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचे एक स्थान आहे. येथे धोरणकर्ते, स्टार्टअप, सर्जनशील व्यक्ती आणि उद्योगक्षेत्रातील धुरीण एकत्र येऊन, भारताच्या विकासात्मक प्राधान्यक्रमाशी तसेच सांस्कृतिक वैविध्याशी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी कृत्रिम बुद्धिमत्ता कशी जोडली जाऊ शकते; यावर चर्चा करणार आहेत.
या उपक्रमातील जाणकार अधिकाऱ्यांनी या दालनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. भारताची एआय परिसंस्था ही जगातील तंत्रज्ञानाची केवळ ग्राहक नव्हे, तर स्वदेशी, आणि सामाजिक दृष्ट्या उचित अशा आणि मोठ्या प्रमाणात राबवता येतील अशा एआय उपायांची जननी आहे- हे जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हे दालन उभारण्यात आले आहे.

एआय क्षेत्रातील भारतीय नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारा मंच
आरोग्यसेवा, माध्यम, आशय, प्रशासन, आणि सामाजिक प्रभाव या क्षेत्रांमध्ये कार्यरत भारतीय स्टार्टअप आणि उद्योजकांना पुढे आणण्याचे काम माहिती प्रसारण मंत्रालयाच्या या दालनामुळे होणार आहे. निवडक संवादसत्रे आणि संस्थापकांच्या नेतृत्वातील चर्चा यांद्वारे हे दालन, भारतीय आणि विदेशी बाजारपेठांसाठी एआय उत्पादने बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांना जगाच्या दृष्टिपथात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
"भारतातील एआय नवोन्मेष नजरेस येण्याची, जागतिक स्तरावर संदर्भासह समजून घेतला जावा, अशीच यामागील कल्पना होती.", असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. या दालनामुळे स्टार्टअप आणि धोरणकर्ते, गुंतवणूकदार, व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्यात थेट संवाद घडून येतो, असेही त्यांनी सांगितले.
दालनाच्या एकूण नियोजनाच्या केंद्रस्थानी आहे वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर. यात गटचर्चा, फायरसाईड चॅट, आणि स्टार्टअप प्रदर्शन यांची मालिका आहे. प्रसारभारतीचा डिजिटल मंच असणाऱ्या- वेव्हज ओटीटी मंचावर या सर्व सत्रांचे थेट प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे परिषदेच्या ठिकाणी उपस्थित नसणाऱ्या प्रेक्षकांनाही याचा आस्वाद घेता येत आहे.
YourStory द्वारे स्टार्टअप केंद्रित प्रोग्रामिंगचे आयोजन
या दालनातील स्टार्टअप आणि नवोन्मेषाची कहाणी YourStory च्या माध्यमातून सादर केली जात आहे. शिखर परिषदेतील विविध सत्रांमधून तिचे सूत्र पकडून उगवते संस्थापक, एआयमधील स्त्री नेतृत्व, आणि भारतासाठी तसेच द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांसाठी उपाय तयार करणाऱ्या कंपन्या यांवर प्रकाश टाकण्याचे काम त्यातून होत आहे.
संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रद्धा शर्मा अनेक चर्चासत्रांमध्ये संचालन करत आहेत. यांत एआय सार्वभौमत्व, सामाजिक प्रभाव टाकणारे स्टार्टअप, आणि संस्थापकांना पुढे नेणारी लाईव्ह सत्रे यांचा समावेश आहे.
औद्योगिक क्षेत्राचे जाणकार असे म्हणतात की- स्टार्टअप केंद्रित माध्यम मंच सरकारी दालनात उभारला गेल्याने, भारत आपल्या नवोन्मेषाची गाथा कशी नव्या पद्धतीने सादर करत आहे, याचे दर्शन घडते. 'केवळ धोरणात्मक संदेशांकडून संस्थापकांच्या नेतृत्वातील कथनांकडे होत जाणारा बदलच यातून सूचित होतो.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दालनामधील कार्यक्रमांची दैनंदिनी
सोमवार 16 फेब्रुवारी
उच्चस्तरीय मान्यवरांच्या सहभागामुळे प्रतिबंधित प्रवेश
- दुपारी 12:00 – 1:00
- पॅनल:उदयोन्मुख स्टार्ट अप्सचे प्रदर्शन (सेट 1 )
- कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राशी संबंधित तीन स्टार्टअप्सशी सूत्रसंचालकाच्या माध्यमातून चर्चा
- दुपारी 3:00 – 4:00
- पॅनल :उदयोन्मुख स्टार्ट अप्स प्रदर्शन (सेट 2)
मंगळवार 17 फेब्रुवारी
प्रशासन सार्वभौमत्व आणि भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाची दिशा यावर दृष्टीक्षेप
- दुपारी 12:00 – 12:30 pm
- फायरसाईड चॅट :- भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ
- ‘कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताची गती कायम राखण्यासाठी’ या विषयावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांशी श्रद्धा शर्मा यांची बातचीत
- दुपारी 1:00 – 1:40
- पॅनल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सार्वभौमत्व
- राष्ट्रीय सुरक्षा, माहितीचे नियंत्रण आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकास
- दुपारी 3:00 – 3:30
- फायरसाईड चॅट :- कुकू एफएम
- संस्थापक लालचंद बिसूद्वारे स्थानिक भाषांमधील सामग्री आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वितरण याबद्दल चर्चा
- संध्याकाळी 5:00 – 6:00
- भूमी पेडणेकर यांच्या समवेत फायरसाईड चॅट
सिनेमा, समर्थन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान
बुधवार 18 फेब्रुवारी
समावेशकता आणि संस्थापक भागीदारी यावर दृष्टिक्षेप
- दुपारी 1:00 – 2:00
- पॅनल:- उदयोन्मुख स्टार्टअप्स प्रदर्शन (सेट 3)
- दुपारी 3:00– 3:40
- पॅनल :- कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये महिलांचा सहभाग
- नेतृत्व आणि न्वोन्मेश यासंबंधी महिला संस्थापक आणि औद्योगिक नेतृत्व यांची चर्चा
- संध्याकाळी 4:30 – 6:00
- स्टार्ट अप्स लाईव्ह विथ एस एस
- संस्थापकांचे दोन मिनिटांचे संक्षिप्त संभाषण
गुरुवार 19 फेब्रुवारी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युअल मॅक्रो यांच्या निर्धारित भेटी मुळे जनतेसाठी प्रवेश नाही.
शुक्रवार 20 फेब्रुवारी
भारत-केंद्री संशोधन आणि परिणाम यावर अंतिम दृष्टिक्षेप
- दुपारी 12:00 – 1:00
- पॅनेल- कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्ट अप्सचा सामाजिक प्रभाव
- दुपारी 3:00
- पॅनेल :- भारतासाठी संधी
- श्रेणी दोन श्रेणी तीन मधील स्टार्ट अप्स भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेसंबधित उपाययोजनांची उभारणी
- दुपारी 4:00
- पॅनल:- उदयोन्मुख स्टार्टअप्स प्रदर्शन (सेट 4)
- जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता चर्चेत भारताचे स्थान
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक स्तरावरच्या चर्चेशी स्थानिक संदर्भात भारतीय कंपन्यांना जोडून घेणे, हा पॅव्हिलियनचा व्यापक उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्टार्ट अप्स, सर्जनशील व्यक्ती आणि धोरणकर्ते यांना एका छताखाली आणून भारताचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित दृष्टिकोन हा दृश्य तसेच बाजारपेठेला योग्य अशा क्षमतेत बदलून जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताच्या आकांक्षांना बळ देण्याच्या दृष्टीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दालनाचे आयोजन केले आहे
भारतीय ए आय इम्पॅक्ट परिषद 2026 जशी पुढे जाईल त्यातून भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्राला आपल्या पद्धतीने कसा आकार, नियंत्रण आणि विस्तार करण्याचा उद्देश बाळगत आहे याचे दर्शन घडेल.
* * *
निलिमा चितळे/जाई वैशंपायन/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228849)
अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam