पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या  हस्ते आसाममधील गुवाहाटी येथे कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 14 FEB 2026 7:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी सांगितले की हा पूल गुवाहाटी आणि आसपासच्या परिसरासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या पुलामुळे संपर्क, सोय आणि व्यापारात लक्षणीय वाढ होणार आहे. तसेच भाविकांना कामाख्या मंदिरात अधिक सुलभतेने जाता येणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमा वरील संदेशात सांगितले.

"ब्रह्मपुत्रा नदीवरील कुमार भास्कर वर्मा सेतू हा गुवाहाटी आणि आसपासच्या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. या पुलामुळे संपर्क, सोय आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढणार असून कामाख्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना अधिक सुलभता मिळणार आहे."

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2228282) आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam