माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यासाठीचा निर्धारित कालावधी 48 दिवसांचा असताना सरासरी 18 दिवसातच प्रमाणन होत असल्याची लोकसभेत माहिती
Posted On:
04 FEB 2026 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी)काम सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 व सिनेमॅटोग्राफ ( प्रमाणन) नियम 2024 अनुसार चालते. वरील नियमावलीतील नियम 37 अन्वये चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यासाठीची कालमर्यादा 48 दिवस आहे. आता ऑनलाइन प्रमाणन पद्धतीनुसार सध्या चित्रपटांच्या प्रमाणनासाठी सरासरी 18 कामाचे दिवस व लघुपटासाठी 3 कामाचे दिवस इतका कालावधी लागतो.
चित्रपट प्रमाणन एपलेट ट्रिब्युनल (एफसीएटी) 2021 साली रद्द केल्यापासून सीबीएफसी ने दरवर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र जारी केलेल्या चित्रपटांचा, तसेच आढावा समितीसमोर (आरसी) आणि उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिल्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
|
Year
|
2021-22
|
2022-23
|
2023-24
|
2024-25
|
2025-26
till date
|
|
Total films certified
|
2031
|
2777
|
2837
|
2687
|
2248
|
|
Challenged before RC
|
25
|
46
|
49
|
38
|
55
|
|
Challenged before HC
|
2
|
4
|
1
|
4
|
10
|
आढावा समितीसमोर येणाऱ्या चित्रपटांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी लागलेला वेळ सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) नियम 2024 च्या नियम 37 (7) मध्ये निश्चित केलेल्या कालमर्यादेनुसार आहे.
सिनेमॅटोग्राफ कायदा 1952 व सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) नियम 2024 नुसार प्रमाणनासंबंधी तक्रार निवारणासाठी बहुस्तरीय यंत्रणेची तरतूद आहे व अर्जदारांना आढावा समितीसमोर अपील करता येते.
माहिती व प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी लोकसभेत प्रियंका गांधी वड्रा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे.
निलीमा चितळे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223358)
अभ्यागत कक्ष : 9