वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उत्पादन तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी भारत ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्रात सामील
Posted On:
04 FEB 2026 11:55AM by PIB Mumbai
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाद्वारे वाणिज्य भवन, नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात भारत, ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र’ (BCIC) यामध्ये सामील झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक विकास संघटनेच्या सहयोगाने सुरू केलेले ‘ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र, ब्रिक्स देशांमधील उत्पादन कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एकात्मिक समर्थन सेवा प्रदान करणारे एक-सेवा केंद्र म्हणून काम करते, ज्याचा उद्देश उद्योग 4.0 क्षमता मजबूत करणे हा आहे.
या प्रसंगी, डीपीआयआयटी आणि युनिडो यांच्यात एक ट्रस्ट फंड करार करण्यात आला. डीपीआयआयटीचे आर्थिक सल्लागार अग्रिम कौशल आणि युनिडोचे संचालक डॉ. क्रिस्टियानो पासिनी यांनी या करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे बीसीआयसीच्या आराखड्यात भारताच्या सहभागाला औपचारिक मान्यता मिळाली.
ब्रिक्स औद्योगिक क्षमतांसाठी भारतातील केंद्र म्हणून राष्ट्रीय उत्पादकता परिषदेची नियुक्ती करण्यात आली आहे. डीपीआयआयटीच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली आणि युनिडोच्या तांत्रिक सहाय्याने,राष्ट्रीय उत्पादकता परिषद ब्रिक्स औद्योगिक क्षमता केंद्र सोबत भारताच्या सहभागाचे नेतृत्व करेल आणि क्षमता निर्माण, उत्पादकता वाढ आणि प्रगत उत्पादन पद्धतींचा अवलंब करण्यात योगदान देईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डीपीआयआयटीचे सचिव अमरदीप सिंग भाटिया यांनी भूषवले आणि एनपीसीच्या महासंचालक नीरजा शेखर यांच्यासह डीपीआयआयटी, एमएसएमई मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, युनिडोचे प्रतिनिधी आणि उद्योग भागीदार फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

***
NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223053)
अभ्यागत कक्ष : 12