युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ मनसुख मांडवीय यांनी युवकांना केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अधिक माहिती व्हावी या उद्देशाने 'माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ चा केला आरंभ
विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधता येणार
Posted On:
02 FEB 2026 7:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी 'माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ या राष्ट्रव्यापी युवा केंद्रित अभियानाचा आरंभ केला. केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल युवकांना अधिक माहिती व्हावी आणि अर्थसंकल्पीय तरतुदी अधिक सुलभ, संबंधित आणि नागरिक-केंद्रित बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026 ला नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडण्याच्या हेतूने देशभरातील महाविद्यालये, संस्था आणि कोचिंग सेंटर्समधील तरुणांना एका सुनियोजित आणि सहभागात्मक चौकटीद्वारे सहभागी करुन घेणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही स्पर्धा उद्यापासून (3 फेब्रुवारी 2026) पासून माय भारत पोर्टलवर (https://mybharat.gov.in/) सुरु होईल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. ही केंद्रीय अर्थसंकल्प 2026 वरील एक राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा असून सर्व तरुणांसाठी माय भारत पोर्टलवर उपलब्ध आहे. यात सहभागी होण्याची अंतिम मुदत 17 फेब्रुवारी आहे. त्यानंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील अव्वल स्पर्धकांची निवड केली जाईल, ज्यांना 17 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या फेरीत सहभाग घेता येईल, ही निबंध लेखन फेरी असेल. निबंध लेखन फेरीत युवकांना विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी निगडित केंद्रीय अर्थसंकल्पावरील 8 मुद्दे दिले जातील. सहभागी स्पर्धक, निबंधांच्या माध्यमातून आपली मते आणि कल्पना मांडतील.
केंद्रीय वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की यंदा विकसित भारत युवा नेतृत्त्व संवाद कार्यक्रमातील युवकांनी सुचवलेल्या काही नवकल्पना अतिशय स्तुत्य असून त्यातील काही केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये अंतर्भूत केल्या आहेत, माय भारत बजेट क्वेस्ट च्या माध्यमातून आपल्याला ही भावना कायम ठेवत युवा आवाजाला पुन्हा एकदा सक्षम करायचे आहे, असे मांडवीया म्हणाले.
निबंधांचे मूल्यांकन 3 मार्च ते 10 मार्च 2026 दरम्यान केले जाईल आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय गुणवत्ता याद्या 10 मार्च 2026 रोजी जाहीर केल्या जातील. त्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विकसित भारत अर्थसंकल्पा' दृष्टिकोनावर संवाद साधण्याची संधी मिळेल. त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक व्यवहार आणि विकासात्मक प्राधान्यक्रमांमध्ये सुजाण तरुणांच्या सहभागाप्रती केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार होईल.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2222311)
अभ्यागत कक्ष : 16