अर्थ मंत्रालय
माहिती तंत्रज्ञान, एव्हीजीसी आणि आतिथ्य क्षेत्रांमध्ये दिव्यांगजनांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी ‘दिव्यांग कौशल्य योजना’
दिव्यांगजनांसाठी आधुनिक किरकोळ प्रकारची सहाय्यक तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी ‘दिव्यांग सहारा योजना’
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2026 1:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026–2027 सादर करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की ‘सबका साथ, सबका विकास’ ही आमची दृष्टी असून, प्रत्येक कुटुंब, समुदाय, प्रदेश आणि क्षेत्राला अर्थपूर्ण सहभागासाठी आवश्यक साधनसंपत्ती, सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी दिव्यांगजनांसाठी केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे -
दिव्यांग कौशल्य योजना:
माहिती तंत्रज्ञीन, एव्हीजीसी (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स), आतिथ्य तसेच अन्न व पेय क्षेत्रांमध्ये दिव्यांगजनांसाठी अनुकूल कार्याभिमुख आणि प्रक्रिया-केंद्रित भूमिका उपलब्ध आहेत. या योजने अंतर्गत प्रत्येक दिव्यांग गटाच्या गरजेनुसार उद्योग-सुसंगत व अनुकूल प्रशिक्षण देऊन उपजीविकेच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
दिव्यांग सहारा योजना:
सर्व पात्र दिव्यांगजनांना उच्च दर्जाची सहाय्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध होणे ही मूलभूत गरज आहे. या अर्थसंकल्पात (i) सहाय्यक उपकरणांच्या उत्पादनात वाढ, संशोधन व विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता एकात्मिकरणासाठी भारताचे कृत्रिम अवयव उत्पादक महामंडळ – ‘एएलआयएमसीओ’ला पाठबळ देणे, (ii) प्रधान मंत्री दिव्याशा केंद्रांचे बळकटीकरण आणि दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उत्पादने वापरून पाहून खरेदी करता येतील अशी आधुनिक किरकोळ प्रकारची‘सहाय्यक तंत्रज्ञान केंद्र’ उभारण्याचा प्रस्ताव आहे.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221483)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam