अर्थ मंत्रालय
सरकारने 16 व्या वित्त आयोगाची कर वाटपाच्या वाट्याचा स्तर 41 टक्क्यांवर कायम ठेवण्याची शिफारस स्वीकारली
आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यांना वित्त आयोग अनुदान म्हणून 1.4 लाख कोटी रुपये दिले जाणार
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2026 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
सरकारने 16 व्या वित्त आयोगाची राज्यांच्या कर वाटपाच्या वाट्याचा स्तर 41 टक्क्यांवर कायम ठेवण्याची शिफारस स्वीकारली आहे.
आज संसदेत आर्थिक वर्ष 2026-27 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “सरकारने आयोगाची 41 टक्के कर वाटपाची शिफारस मान्य केली आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार, मी आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यांना वित्त आयोग अनुदान म्हणून 1.4 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन अनुदानाचा समावेश आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, आयोगाने आपला अहवाल 17 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रपतींना सादर केला आणि संविधानाच्या अनुच्छेद 281 अंतर्गत अनिवार्य केल्यानुसार, सरकार हा अहवाल आणि त्यातील शिफारशींवर केलेल्या कार्यवाहीसंदर्भात स्पष्टीकरणात्मक निवेदन संसदेत सादर करणार आहे.
* * *
नाना मेश्राम/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221473)
आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam