पंतप्रधान कार्यालय
बीटिंग रिट्रीट समारंभ भारताच्या समृद्ध लष्करी वारशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो: पंतप्रधान
विजयामध्ये विवेक आणि सन्मान जपण्यावर भर देणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2026 12:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
बीटिंग रिट्रीट समारंभ हा प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपाचे प्रतीक आहे आणि तो भारताच्या समृद्ध लष्करी वारशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. "देशाच्या संरक्षणासाठी समर्पित असलेल्या आपल्या सशस्त्र दलांचा आम्हाला नितांत अभिमान आहे", पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले, ज्यामध्ये एखादा योद्धा विजयाकडे कूच करत असताना विवेक आणि सन्मान जपण्यावर भर देण्यात आला आहे.
"एको बहूनामसि मन्य ईडिता विशं विशं युद्धाय सं शिशाधि।
अकृत्तरुक्त्वया युजा वयं द्युमन्तं घोषं विजयाय कृण्मसि॥"
या सुभाषिताचा अर्थ हा आहे की, "हे शूर योद्ध्या! तुझ्या क्रोधाला विवेकाचे मार्गदर्शन लाभले पाहिजे. तू हजारो लोकांमध्ये एक महानायक आहेस. तुझ्या लोकांना सुशासन करण्यास आणि सन्मानाने लढण्यास शिकव. आपण विजयाकडे कूच करत असताना, आम्हाला तुझ्या सोबत जल्लोष करायचा आहे!"
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“आज संध्याकाळी बीटिंग रिट्रीटचे आयोजन होईल. हे प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या समारोपाचे प्रतीक आहे. यामध्ये भारताच्या समृद्ध लष्करी वारशाचे सामर्थ्य दिसेल. देशाच्या संरक्षणासाठी समर्पित आमच्या सशस्त्र दलांचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.
एको बहूनामसि मन्य ईडिता विशं विशं युद्धाय सं शिशाधि।
अकृत्तरुक्त्वया युजा वयं द्युमन्तं घोषं विजयाय कृण्मसि॥"
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219930)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam