पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे मानले आभार

प्रविष्टि तिथि: 26 JAN 2026 11:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2026

 

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा आणि सदिच्छा प्रकट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना धन्यवाद दिले.

भूतानच्या पंतप्रधानांनी एक्स वर लिहिलेल्या संदेशास उत्तर देताना पंतप्रधान म्हणतात-

"भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान त्शेरिंग तोबगे आणि भूतानवासीयांचे आभार. आपल्या दोन देशांमधील मैत्रीचे विशेष बंध आणि अद्वितीय असे नातेसंबंध उत्तरोत्तर अधिक शक्तिशाली होण्याच्या दिशेने प्रवास करोत. @tsheringtobgay”

 

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी एक्स वर लिहिलेल्या संदेशास पंतप्रधान उत्तर देतात-

"राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, आपण माझे जवळचे स्नेही असून, भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल, मी आपले आभार मानतो. लवकरच भारतात आपले स्वागत करण्यास आणि भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी अधिक दृढ करून त्यामध्ये वैविध्यपूर्णता आणण्यास मी उत्सुक आहे. @EmmanuelMacron”

 

सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशास प्रत्युत्तर देताना पंतप्रधान म्हणतात,

"प्रिय राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलाइड्स, आपल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सायप्रस हा भारताचा जवळचा मित्र आणि एक विश्वासू भागीदार आहे. आणि आपल्या सर्वंकष भागीदारीची खोली आणखी वाढवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. आपले भारतात स्वागत करण्यास मी उत्सुक आहे. @Christodulides”

 

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी पाठवलेल्या संदेशाला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणतात,

"धन्यवाद राष्ट्रपती मुइज्जू. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण मनापासून पाठवलेल्या शुभेच्छा आणि सदिच्छांबद्दल हार्दिक  आभार . आपल्या दोन्ही देशांमधील जनतेच्या हितासाठी एकत्रित काम आपण सुरूच ठेवू. मालदीवमधील आगामी उत्सवकाळासाठी आपणांस व मालदीवमधील मित्रांस मनःपूर्वक शुभेच्छा. @MMuizzu"

 

* * *

निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219261) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada , Malayalam