भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय निवडणूक आयोग उद्या 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2026 3:00PM by PIB Mumbai

 

भारतीय निवडणूक आयोग उद्या नवी दिल्लीत 16 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. ‘माझा भारत माझे मत’ हा या वर्षीचा विषय आहे आणि ‘भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक’ हे त्याचे बोधवाक्य आहे.

नवी दिल्लीत होणाऱ्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री ( स्वतंत्र पदभार) अर्जुन राम मेघवाल सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कार्यक्रमाचे नेतृत्व करतील त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंह संधू व डॉ विवेक जोशी उपस्थित असतील.

प्रथेप्रमाणे भारताचे माननीय राष्ट्रपती समारंभाला संबोधित करतील व मतदार यादीत नुकतेच नाव समाविष्ट झालेल्या तरुण मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र प्रदान करतील. सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतीअंतर्गत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, निवडणूक व्यवस्थापन व वाहतुक, मतदार जागृतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम, आदर्श व्यवहार संहिता, प्रशिक्षण व क्षमता विकास या सोबत माध्यमकर्मींसाठी देखील अनेक विशेष पुरस्कार माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतील.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दोन प्रकाशने होणार आहेत- ‘2025-नवकल्पनांचे व उपक्रमाचे वर्ष’ तसेच बिहारमधील निवडणुकांच्या यशस्वी आयोजनाबद्दल पुस्तक ‘चुनाव का पर्व, बिहार का गर्व’ निवडणूक व्यवस्थापनात व लोकशाही विकासामधील निवडणूक आयोगाच्या जागतिक नेतृत्वावर आधारित चित्रफितीचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात येईल.

मतदार याद्यांची निर्मिती, निवडणुकांचे आयोजन, अशा निवडणुकांच्या विविध पैलूंबद्दल माहिती देणारे एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या विविध उपक्रमाबद्दल व बिहार विधानसभा निवडणुकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल या प्रदर्शनात माहिती देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशभरात राज्य, व जिल्हास्तरावर देखील अनेक समारंभ आयोजित करण्यात येत आहेत . यात मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयांचा समावेश असेल. बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांतर्फे देखील त्यांच्या मतदान केंद्र ठिकाणांवर असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत व त्यात नवीन नोंदणी केलेल्या मतदारांचा सत्कार करून त्यांची मतदार ओळखपत्रे वितरित केली जातील.

***

शैलेश पाटील/उमा रायकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218224) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu , Kannada , Malayalam