गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम सिंहभूममध्ये सीआरपीएफ आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत नक्षलविरोधी कारवाईत मिळाले मोठे यश


अनेक दशकांपासून भीती आणि दहशत निर्माण करणा-या नक्षलवादाचे 31 मार्च 2026 पूर्वी उच्चाटन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध - अमित शाह

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, झारखंडमधील पश्चिम सिंहभूममध्ये 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी केंद्रीय समिती सदस्य 'अनल उर्फ पतिराम मांझी' आणि इतर 15 नक्षलवाद्यांना मारणे हे नक्षलविरोधी कारवाईचे मोठे यश आहे.

समाज माध्‍यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, आज पश्चिम सिंहभूममध्ये सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दल आणि झारखंड पोलिसांद्वारे राबवण्यात आलेल्या  संयुक्त कारवाईमुळे नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. यामध्‍ये 1 कोटी रुपयांचे बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी केंद्रीय समिती सदस्य 'अनल उर्फ पतिराम मांझी' आणि इतर 15 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसाचार, दहशतवाद आणि शस्त्रांशी जोडणारी विचारसरणी सोडून विकास आणि विश्वासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217489) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu