राष्ट्रपती कार्यालय
अमृत उद्यान 3 फेब्रुवारीपासून जनतेसाठी खुले होणार
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 11:02AM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान 3 फेब्रुवारी ते 31 मार्च 2026 या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे. आठवड्यातून सहा दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 (शेवटचा प्रवेश संध्याकाळी 5.15 वाजता) दरम्यान लोक या उद्यानाला भेट देऊ शकतात. उद्यान देखभालीचे दिवस असलेल्या सोमवारी तसेच होळीनिमित्त 4 मार्च रोजी बंद राहील.
सर्व अभ्यागतांसाठी प्रवेश आणि निर्गमन राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून असेल, जिथे नॉर्थ अव्हेन्यू राष्ट्रपती भवनाला जोडले आहे. अभ्यागतांच्या सोयीसाठी, सेंट्रल सेक्रेटरीएट मेट्रो स्टेशन ते गेट क्रमांक 35 पर्यंत शटल बस सेवा सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत दर 30 मिनिटांनी उपलब्ध असेल. 'अमृत उद्यानासाठी शटल सेवा' या बॅनरद्वारे शटल बसेस ओळखता येतील.
***
NehaKulkarni/SushamaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216721)
आगंतुक पटल : 27