गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ऊर्जा, उत्साह आणि आनंदाचा सण असलेल्या 'मकर संक्रांती'निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या


सुगीच्या या सणामुळे आपली एकता अधिक दृढ होवो आणि सर्वांना समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाचा आशीर्वाद मिळो

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज ऊर्जा, उत्साह आणि आनंदाचा सण असलेल्या मकर संक्रांतीच्या चैतन्यमय आणि शुभप्रद सणाच्या निमित्ताने देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रादेशिक सणांच्या विशेष शुभेच्छाही दिल्या आहेत— कर्नाटकच्या जनतेला मकर संक्रांतीच्या; आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या जनतेला भोगी, संक्रांती आणि कनुमाच्या; गुजरातच्या जनतेला उत्तरायणच्या; आणि आसामच्या जनतेला माघ बिहूच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्सवरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “ऊर्जा, उत्साह आणि चैतन्याचा सण असलेल्या ‘मकर संक्रांती’च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. हा सण तुमच्या सर्वांच्या जीवनात अपार आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.”

एका दुसऱ्या 'एक्स' पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, “मकर संक्रांतीच्या पवित्र प्रसंगी कर्नाटकच्या माझ्या बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा ! हा पवित्र सण आपल्या जीवनात नवीन उत्साह घेऊन येवो आणि आपले संबंध अधिक दृढ करो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी मी सदिच्छा देतो.”

केंद्रीय गृहमंत्र्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आमच्या तेलुगू भगिनी आणि बांधवांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. भोगी, संक्रांती आणि कनुमाचे सण प्रत्येक घराला  समृद्धी, आनंद आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देवो.”

दुसऱ्या एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी उत्तरायणाच्या शुभ प्रसंगी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, सर्वांच्या कल्याणासाठी भगवान सूर्यनारायणाकडे प्रार्थना करीत असल्याचे म्हटले आहे.

एक्सवरील आणखी एका पोस्टमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी आसामच्या जनतेला माघ बिहूच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की, “आसाममधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माघ बिहूच्या हार्दिक शुभेच्छा. सुगीचा हा सण आपली एकता अधिक दृढ करो आणि सर्वांना समृद्धी, उत्तम आरोग्य व आनंदाचा आशीर्वाद देवो.”


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2214603) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Bengali , Bengali-TR , Assamese , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam