पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त सर्व देशवासियांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधानांनी मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे महत्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
14 JAN 2026 10:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
मकर संक्रांती हा सण भारतीय संस्कृती आणि परंपरांची समृद्धी दर्शवणारा, सलोखा, समृद्धी आणि एकोप्याची भावना वाढवणारा सण आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. तिळ आणि गुळाचा गोडवा सर्वांच्या जीवनात आनंद आणि यश घेऊन येवो, तसेच राष्ट्राच्या कल्याणासाठी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने देशाचे कल्याण होवो, अशी कामना त्यांनी केली.
पंतप्रधानांनी भगवान सूर्याचा आशीर्वाद मागणारे एक संस्कृत सुभाषित देखील सामायिक केले, ज्यामध्ये या सणाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील स्वतंत्र संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
“सर्व देशवासियांना मकर संक्रांतीच्या असीम शुभेच्छा. तिळगुळाच्या गोडव्याने भरलेला भारतीय संस्कृती आणि परंपरेचा हा दिव्य सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. सूर्यदेव सर्वांचे कल्याण करो.”
“संक्रांतीचा हा पावन पर्व देशाच्या विविध भागांत स्थानिक रीतिरिवाजांनुसार साजरा केला जातो. सूर्यदेवांकडे सर्वांच्या सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो.
सूर्यो देवो दिवं गच्छेत् मकरस्थो रविः प्रभुः।
उत्तरायणं महापुण्यं सर्वपापप्रणाशनम्॥”
***
NehaKulkarni/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214419)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam