भारतीय निवडणूक आयोग
लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषद, 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने आयोजित केली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद
लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषदेत सुमारे 100 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
1. भारतीय निवडणूक आयोगाने आज नवी दिल्लीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद आयोजित केली. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 21 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषद, 2026 च्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
2. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासमवेत उपस्थितांना संबोधित केले आणि त्यांना लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषद 2026 च्या बारकाव्यांविषयी तसेच त्यांच्या विशिष्ट भूमिकांविषयी माहिती दिली.
3. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांनी लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषदेत संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना ज्या 36 संकल्पांनांवर आधारित समूहांचे नेतृत्त्व करायचे आहे, त्याविषयी मार्गदर्शन केले. या संकल्पना निवडणूक व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणाऱ्या असून निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या समृद्ध आणि विविध अनुभवांवर आधारित ज्ञानसंच विकसित करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
4. आयआयसीडीईएम 2026 ही निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही या क्षेत्रात भारताने आयोजित केलेली अशा प्रकारची पहिलीच जागतिक परिषद आहे. या परिषदेला जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे 100 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी, भारतातील परदेशी दूतावास, निवडणूक क्षेत्रातील शैक्षणिक आणि व्यावसायिक तज्ञ सहभागी होणार आहेत.
5. आयआयसीडीईएम 2026 मध्ये उद्घाटन सत्र, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या नेतृत्वाची सर्वसाधारण (प्लेनरी) बैठक,निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या कार्यगटांच्या बैठका, तसेच ECINETचे उद्घाटन अशा सामान्य आणि सर्वसमावेशक सत्रांचा समावेश असेल. यासोबतच जागतिक निवडणूक विषय, आदर्श आंतरराष्ट्रीय निवडणूक मानके, तसेच निवडणूक प्रक्रियांतील सर्वोत्तम पद्धती आणि नवकल्पना यांवर आधारित संकल्पनांवर आधारित सत्रे आयोजित करण्यात येतील.
6. याशिवाय या परिषदेत अग्रगण्य शैक्षणिक संस्थांचा सहभागही पाहायला मिळणार असून, त्यामध्ये भारतीय 4 तंत्रज्ञान संस्था पुढील संस्था, 6 भारतीय व्यवस्थापन संस्था, 12 राष्ट्रीय विधी विद्यापीठे आणि भारतीय जनसंचार संस्था यांचा समावेश असेल. याशिवाय राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील 36 विषयाधारित गट, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञांचा सहभाग, चर्चासत्रांमध्ये मोलाचे योगदान देणार आहेत.
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212913)
आगंतुक पटल : 11