पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या, सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 4:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र सोमनाथ धाम ला वंदन केले आणि राष्ट्राच्या एकत्रित भावनेला जागृत करणाऱ्या सोमनाथ धामचे कालातीत माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले.
सोमनाथ मंदिराने शतकानुशतके कित्येक पिढयांना दैवी चैतन्याने प्रेरणा दिली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे. ही दैवी ऊर्जा युगानुयुगे श्रद्धा, साहस आणि आत्मसन्मानाचा मार्ग प्रज्वलित करत आहे आणि दीपस्तंभ बनून भारतातील लोकांना मार्गदर्शन करत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक करत पंतप्रधानांनी म्हटले आहे :
"पवित्र सोमनाथ मंदीराचा भव्य वारसा कित्येक शतकांपासून लोकांच्या मनामनात चैतन्य निर्माण करत आहे. ही दैवी ऊर्जा युगानुयुगे श्रद्धा, साहस आणि स्वाभिमानाचा मार्ग प्रज्वलित करत राहील.
आदिनाथेन शर्वेण सर्वप्राणिहिताय वै।
आद्यतत्त्वान्यथानीयं क्षेत्रमेतन्महाप्रभम्।
प्रभासितं महादेवि यत्र सिद्ध्यन्ति मानवाः॥”
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212897)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam