पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आशयघन आणि तथ्य आधारित चर्चेचे महत्त्व स्पष्ट करणारा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
या लेखामध्ये भारत धोरणांना बळकटी देणारी तसेच सुधारणांचे संरक्षण करणारी ठोस आणि पुराव्याधिष्ठित टीका खुलेपणाने स्वीकारतो, असा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. भारताच्या लोकशाही प्रगतीमध्ये नकारात्मकता व निराशावाद यांना कोणतेही स्थान नाही, यावर लेखात स्पष्टपणे भर देण्यात आला आहे. तसेच, आशयघन आणि तथ्य आधारित चर्चेचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारची चर्चा नव्या वर्षात देशासाठी वरदान ठरू शकते, असे लेखात नमूद करण्यात आले आहे.
‘एक्स’ या सामाजिक माध्यमांवर सामायिक केलेल्या लेखात पंतप्रधान म्हणाले की,
धोरणांना बळकटी देणारी आणि सुधारणांचे संरक्षण करणारी ठोस, पुराव्याधिष्ठित टीका भारत स्वागतार्ह मानतो. लोकशाही प्रगतीमध्ये नकारात्मकतेला कोणतेही स्थान नसून, केंद्रीय मंत्री @HardeepSPuri यांच्या या लेखात, आशयघन चर्चा प्रतिबिंबित होत असून नव्या वर्षात तो देशासाठी लाभदायक ठरू शकतो. नागरिकांनी हा लेख अवश्य वाचावा, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
निलीमा चितळे/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212473)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam