रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांवरील मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी तातडीच्या कारवाईची केली मागणी

प्रविष्टि तिथि: 06 JAN 2026 3:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2026

राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक पट्ट्यांमधील मोबाईल नेटवर्क संपर्क व्यवस्थेची गंभीर समस्या लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या, विशेषतः नवीन विकसित आणि दुर्गम भागांतील अनेक टप्प्यांमध्ये मोबाईल नेटवर्क संपर्काच्या अनुपलब्धतेची समस्या सोडवण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदात्यांना (टीएसपी) योग्य निर्देश जारी करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

सार्वजनिक सुरक्षा परिणाम आणि राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचे धोरणात्मक महत्त्व यावर भर देत प्राधिकरणाने देशभरातील राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉरवर मोबाईल नेटवर्क संपर्क सुधारण्यासाठी जलद आणि समन्वित दृष्टिकोन अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

प्राधिकरणाने केलेल्या सर्वसमावेशक मूल्यांकनाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग जाळ्यातील सुमारे 1,750 किलोमीटर अंतरामधील 424 ठिकाणे मोबाईल नेटवर्कच्या  अनुपलब्धतेमुळे गंभीरपणे प्रभावित झाली असल्याचे लक्षात आले आहे. या ठिकाणांची सविस्तर माहिती संकलित करून आवश्यक कारवाईसाठी दूरसंचार विभाग आणि ट्राय यांच्याकडे औपचारिकपणे सामायिक करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, प्राधिकरणाने दूरसंचार कंपन्यांना भू-नकाशित अपघातप्रवण ठिकाणी, ज्यात मोकाट जनावरांच्या हालचालीमुळे प्रभावित झालेले रस्ते आणि इतर ओळखल्या गेलेल्या धोक्यांचा समावेश आहे,सक्रिय एसएमएस किंवा फ्लॅश एसएमएस अलर्ट प्रसारित करण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्याची विनंती ट्रायला केली आहे. हे सावधगिरीचे इशारे वापरकर्ते अशा ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचावेत,जेणेकरून त्यांना वेळेवर सावधगिरी बाळगता येईल आणि ते अधिक सुरक्षितपणे वाहन चालवू शकतील,अशी योजना आहे.

मोबाइल नेटवर्क संपर्कामधील त्रुटी दूर करण्यासाठी हस्तक्षेप करून आणि राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षितता वाढवून प्राधिकरण या गोष्टीची पुष्टी करते की, राष्ट्रीय महामार्ग नेटवर्क केवळ भौतिकदृष्ट्या उत्तम रीतीने जोडलेले नाही, तर ते डिजिटलदृष्ट्या सक्षम देखील आहे याची खात्री करण्यासाठी सर्व संबंधित हितधारकांसोबत निकट समन्वय साधून काम करण्यास ते वचनबद्ध आहे. हे प्रयत्न देशभरातील नागरिकांसाठी सुरक्षित, कार्यक्षम आणि वापरकर्ता-केंद्रित राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या प्राधिकरणाच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत आहेत.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2211761) आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Tamil , Telugu , Malayalam