भारतीय निवडणूक आयोग
ECINet ॲप मध्ये सुधारणा करण्यासाठी नागरिकांनी 10 जानेवारीपर्यंत आपल्या सूचना द्याव्यात असे भारत निवडणूक आयोगाचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 2:29PM by PIB Mumbai
- सर्व नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाचे ECINet हे ॲप डाउनलोड करावे, तसेच या ॲपमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यातील Submit a Suggestion या पर्यायाचा वापर करून आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन भारतीय निवडणूक आयोगाने केले आहे. याअंतर्गत नागरिकांना 10 जानेवारी 2026 पर्यंत आपल्या सूचना दाखल करता येणार आहेत.
- ECINet ॲपच्या प्रायोगिक तत्वावरील आवृत्तीअंतर्गत मतदारांना उत्तम सेवा, मतदानाच्या टक्केवारीच्या कलांची जलद गतीने माहिती उपलब्ध करून देणे आणि मतदानानंतर 72 तासांच्या आत इंडेक्स कार्ड प्रसिद्ध करणे शक्य होणार आहे. यापूर्वी या प्रक्रियेसाठी अनेक आठवडे किंवा महिन्याचा कालावधी लागायचा. बिहार विधानसभा निवडणूक 2025 आणि पोटनिवडणुकीदरम्यान या ॲपची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.
- मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून मिळालेल्या अभिप्रायानुसार या व्यासपीठात सातत्याने सुधारणा केली गेली आहे. आता नागरिकांनी दिलेल्या सूचनाही तपासल्या जातील आणि हे व्यासपीठ अधिक वापरकर्ताभिमुख बनवण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक ते बदल केले जातील. ECINet या ॲपचा या महिनाच्या अखेरीला अधिकृतपणे प्रारंभ केला जाणार आहे.
- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली तसेच, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाने घेतलेला हा एक मोठा पुढाकार आहे. 04 मे 2025 रोजी या ॲपची घोषणा केली गेली होती, आणि तेव्हापासून ते विकसित करण्याचे कामही सुरू केले गेले होते.
- ECINet हे नागरिकांकरता विविध सोयी सुविधा एकाच ठिकाणी असलेले एकात्मिक ॲप आहे, याअंतर्गत Voter Helpline App (VHA), cVIGIL, Saksham, Voter Turnout App (मतदान विषयक कल), Know Your Candidate (KYC) या आणि यांसारख्या सेवा सुविधांशी संबंधीत निवडणूक विषयक 40 स्वतंत्र ॲप्लिकेशन्स आणि संकेतस्थळांचे एकात्मिकरण केले गेले आहेत. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरही उपलब्ध करून दिले आहे.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211101)
आगंतुक पटल : 39