गृह मंत्रालय
राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वाहिली आदरांजली
स्वातंत्र्याच्या रक्षणाचा संकल्प, आपला स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या शिवगंगेच्या राणीने आपल्या अद्वितीय लष्करी पराक्रमाने वसाहतवादी राज्यकर्त्यांचा पराभव केला, त्यांनी भारतीयांच्या मनात ब्रिटिशांना हूसकावून लावण्याची प्रखर इच्छा प्रज्वलित केली
त्या आपल्यासाठी प्रेरणेचा शाश्वत स्त्रोत राहतील
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 1:36PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण केली.
यासंदर्भात अमित शाह यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश
राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आपला स्वाभिमान, देशभक्ती आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाप्रती असलेल्या आपल्या संकल्पाचे त्या एक मूर्तिमंत रूप आहेत.
शिवगंगेच्या या राणीने आपल्या अद्वितीय लष्करी पराक्रमाने वसाहतवादी राज्यकर्त्यांचा पराभव केला आणि भारतीयांच्या मनात ब्रिटिशांना हूसकावून लावण्याची प्रखर इच्छाशक्ती प्रज्वलित केली. राणी वेलू नचियार या आपल्यासाठी प्रेरणेचा शाश्वत स्त्रोत राहतील.
***
हर्षल अकुडे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211098)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam