राष्ट्रपती कार्यालय
नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नववर्ष 2026च्या पूर्वसंध्येला सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या, “नववर्षाच्या आनंददायी प्रसंगी, देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देते.
नववर्ष नवचैतन्य आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक आहे. तसेच आत्मपरीक्षण आणि नवे संकल्प करण्यासाठी ही एक संधी आहे. या प्रसंगी, राष्ट्राच्या विकासासाठी, सामाजिक सलोख्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या वचनबद्धतेला आपण अधिक बळ देऊया.
सन 2026 आपल्या जीवनात शांतता, आनंद व समृद्धी घेऊन येवो आणि अधिक मजबूत व संपन्न भारताच्या उभारणीसाठी नवी ऊर्जा प्रदान करो.”
राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा
* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210285)
आगंतुक पटल : 11