पंतप्रधान कार्यालय
फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 2:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यापाठोपाठ अर्जुनने पुन्हा एकदा मिळविलेले यश जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण ठरले आहे.
आपल्या एक्स वरील संदेशात मोदी यांनी म्हटले आहे,
“बुद्धिबळ क्षेत्रातील भारताची प्रगती अखंड सुरू आहे!
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक आणि त्याआधी अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत मिळविलेले कांस्य पदक या यशाबद्दल अर्जुन एरिगैसी याचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याचे कौशल्य, संयम आणि बुद्धिबळाविषयीची आवड आदर्श आहे. त्याची यशोगाथा आपल्या तरुण पिढीला सातत्याने प्रेरणा देत राहील. त्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
@ArjunErigaisi”
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210104)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam