पंतप्रधान कार्यालय
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख केले व्यक्त
Posted On:
30 DEC 2025 12:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. झिया यांचे ढाक्यात निधन झाले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणालेः
“माजी पंतप्रधान आणि बीएनपीच्या अध्यक्ष बेगम खालिदा झिया यांच्या ढाका येथे झालेल्या निधनाचे वृत्त समजल्यावर अत्यंत दुःख झाले.
त्यांच्या कुटुंबियांच्या आणि बांगलादेशातील सर्व जनतेच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा आघात सहन करण्याची शक्ती देवो.
बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून, बांगलादेशच्या विकासातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि भारत-बांगलादेश संबंधांमधील त्यांची भूमिका नेहमीच स्मरणात राहील.
2015 मध्ये ढाका येथे त्यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीची मला आठवण आहे. त्यांची दूरदृष्टी आणि वारसा आमच्या भागीदारीला यापुढेही मार्गदर्शन करत राहील, अशी आम्ही आशा करतो.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”
* * *
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2209709)
अभ्यागत कक्ष : 53
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam