पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘मन की बात’च्या 129व्या भागाची झलक केली शेअर
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2025 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या 129व्या भागाची झलक शेअर केली. ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये, श्री मोदी म्हणाले:
"140 कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्यांमुळे, 2025 मध्ये आपल्या देशाने विविध क्षेत्रांमध्ये बरेच काही साध्य केले आहे."
#MannKiBaat
“विकसित भारत यंग लिडर्स संवाद हे राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. 12 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि आमच्या युवा शक्तीचे विचार आणि सूचना ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे..”
#MannKiBaat
"स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आपल्या तरुणांना आणि नवोन्मेषकांना प्रमुख राष्ट्रीय आणि सामाजिक आव्हानांवर उपाय प्रदान करण्यासाठी व्यासपीठ देते."
#MannKiBaat
"भारतातील तरुणाई शाश्वततेबद्दल खूप उत्सुकता दाखवत आहे. या संदर्भात, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केल्याबद्दल मणिपूर येथील मोइरंगथेम सेठ यांचे कौतुक केले."
#MannKiBaat
“पुढील महिन्यात, आपण पार्वती गिरी जी यांची जन्मशताब्दी साजरी करू, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले आणि गरिबांसह उपेक्षितांच्या उत्थानावरही लक्ष केंद्रित केले. आजच्या #MannKiBaat मध्ये त्यांना आदरांजली वाहिली.”
"रण बोलावत आहे!
कच्छला या आणि रण उत्सवाचा आनंद घ्या.
लोकपरंपरा, स्थानिक कारागिरीची चमक आणि कच्छच्या कालातीत सौंदर्याचे साक्षीदार व्हा."
#MannKiBaat
“दुबईमध्ये भारतीय समुदायामध्ये सुंदर कन्नड भाषेला लोकप्रिय करण्यासाठी सुरू असलेल्या एका प्रशंसनीय प्रयत्नाला अधोरेखित केले.”
#MannKiBaat
"नरसापुरममधील या प्रयत्नामुळे स्थानिक लेस क्राफ्ट पुन्हा उदयास आले आहे आणि त्यामुळे अनेक लोक सक्षम बनत आहे."
#MannKiBaat
“ದುಬೈನಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿರುವ ಭಾರತೀಯ ಅನಿವಾಸಿಗಳು, ಸುಂದರವಾದ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ಜನಪ್ರಿಯಗೊಳಿಸಲು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಶ್ಲಾಘನೀಯ ಪ್ರಯತ್ನದ ಬಗ್ಗೆ ಒತ್ತಿ ಹೇಳಿದೆ”
#MannKiBaat
“నరసాపురంలో చేపట్టిన ఈ ప్రయత్నం స్థానిక లేస్ క్రాఫ్ట్ కు మళ్లీ ప్రాణం పోసి అనేక మందికి సాధికారత చేకూర్చింది…”
#MannKiBaat
“ଆସନ୍ତା ମାସ ଆମେ ପାର୍ବତୀ ଗିରିଙ୍କ ଜନ୍ମ ଶତବାର୍ଷିକୀ ପାଳନ କରିବା, ଯିଏକିଆମ ସ୍ବାଧୀନତା ଆନ୍ଦୋଳନରେ ଯୋଗଦାନ କରିଥିଲେ ଏବଂ ଗରିବ ଓ ବଞ୍ଚିତଙ୍କକଲ୍ଯାଣ ପ୍ରତି ଧ୍ଯାନ ଦେଇଥିଲେ । ଆଜିର #MannKiBaat ରେ ତାଙ୍କୁ ଶ୍ରଦ୍ଧାଞ୍ଜଳିଅର୍ପଣ କରୁଛି ।”
"फिजीमध्ये तमिळ भाषेची लोकप्रियता पाहून आनंद झाला, कारण या राष्ट्राशी आपले सांस्कृतिक संबंध मजबूत आहेत."
#MannKiBaat
"काशीच्या लोकांमध्ये तमिळ लोकप्रिय होत आहे हे पाहून आनंद होतो. हे काशी तमिळ संगमम दरम्यान स्पष्टपणे दिसून आले."
#MannKiBaat
“நாம் வலுவான கலாச்சாரத் தொடர்புகளைக் கொண்டுள்ள நாடான ஃபிஜியில் தமிழ் பிரபலம் அடைவதைக் காண்பதும் மகிழ்ச்சி அளிக்கிறது.”
#MannKiBaat
“காசி தமிழ் சங்கமத்தின் போது, காசி மக்களிடையே தமிழ் பிரபலமடைந்து வருவது தெளிவாகக் காணப்பட்டது. இது மனநிறைவைத் தருகிறது.”
#MannKiBaat
"बारामुल्ला येथील जहानपोरा येथील बौद्ध संकुल जम्मू आणि काश्मीरची प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक ओळख प्रकट करते. येथील बौद्ध स्तूप कसे सापडले याची कहाणी देखील रोचक आहे!"
#MannKiBaat
"भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेले फिजी असो किंवा आपले स्वतःचे काशी असो, तमिळ भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेले प्रशंसनीय उपक्रम हृदयस्पर्शी आहेत. मला आनंद आहे की आज, देशाच्या इतर अनेक भागांमध्ये, जगातील या सर्वात जुन्या भाषेबद्दल रस वाढत आहे."
#MannKiBaat
"आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या अलिकडच्या अहवालातून असे दिसून आले आहे की न्यूमोनिया आणि यूटीआय सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स प्रभावहीन ठरत आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचा अविचारी वापर. म्हणून, मी सर्वांना डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेणे टाळण्याचा आग्रह करतो."
#MannKiBaat
"मणिपूरच्या चुराचांदपूर येथील मार्गारेट रामथर्सियम यांनी मणिपूरच्या पारंपारिक हस्तकला लोकप्रिय करण्यासाठी आणि इतरांच्या जीवनाला सक्षम बनवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल मला त्यांचा अभिमान आहे."
#MannKiBaat
"मणिपूरमधील सेनापती जिल्ह्यातील के. चोखोने क्रिचेना यांनी फुलशेतीमध्ये असाधारण काम केले आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे जीवनही बदलले आहे."
#MannKiBaat
* * *
नितीन फुल्लुके/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209409)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam