गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण
अद्वितीय संविधानिक व कायदेविषयक तज्ज्ञ आणि उत्कृष्ट वक्ते असलेले जेटली यांनी एक संसदपटू म्हणून अमिट ठसा उमटवला असून अनेक ऐतिहासिक कायदेशीर विषयांतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाईल
आपल्या तीक्ष्ण कायदेविषयक कुशलतेच्या जोरावर पक्ष बळकट करण्यामधील त्यांची समर्पित भूमिका काळाच्या प्रत्येक कसोटीवर टिकून राहील
प्रविष्टि तिथि:
28 DEC 2025 2:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण केले.
सामाजिक संपर्क माध्यम ‘X’ वरील संदेशामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अरुण जेटली यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. अद्वितीय संविधानिक व कायदेविषयक तज्ज्ञ आणि उत्कृष्ट वक्ते असलेले जेटली यांनी संसदपटू म्हणून अमिट वारसा सोडला असून अनेक ऐतिहासिक कायदेशीर विषयांतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना स्मरणात ठेवले जाईल. आपल्या तीक्ष्ण कायदेविषयक कौशल्याच्या जोरावर पक्ष बळकट करण्यामधील त्यांची समर्पित भूमिका काळाच्या प्रत्येक कसोटीवर टिकून राहील.”
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209193)
आगंतुक पटल : 4