गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारतीय संविधान संथालीमध्ये प्रकाशित करण्याच्या ऐतिहासिक कार्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
Posted On:
26 DEC 2025 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
संथाली भाषेत भारतीय राज्यघटना प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मनापासून आभार मानले.
समाज माध्यम ‘एक्स’ वर एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "भारतीय भाषांचा आदर करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल! संथाली भाषेत आपल्या संविधानाचे प्रकाशन ही संथाली समुदायासाठी तसेच संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही राज्यघटना अलचिकी लिपीमध्ये प्रकाशित करण्यात आलेली असल्यामुळे राज्यघटनेतील आदर्श आणि मूल्ये आदिवासी समुदायापर्यंत अधिक स्पष्टपणे पोहोचवू शकेल. तसेच आपल्या घटनाकारांचे स्वप्न साकार करेल. या ऐतिहासिक कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार."
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208943)
अभ्यागत कक्ष : 27