मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2025 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या 16.076 किमी लांबीच्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली. यामध्ये 1.आर.के.आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (9.913 Kms), 2.एअरोसिटी ते इंदिरा गांधी देशांतर्गत विमानतळ (आयजीडीटी) टी-1 (2.263 kms) तसेच  3.तुघलकाबाद ते कालिंदी कुंज (3.9 kms) यांचा समावेश असून या मार्गिकांमुळे राष्ट्रीय राजधानीतील संपर्क व्यवस्थेत भरीव वाढ होईल. दिल्ली मेट्रोच्या पाचव्या टप्प्याच्या (ए) प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 12014.91 कोटी रुपये असून भारत सरकार, दिल्ली सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्था यांच्यातर्फे या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा मार्गिका दिल्लीतील सर्व कर्तव्य भवनांपर्यंत जोडणी उपलब्ध करून देऊन या भागातील कार्यालयांमध्ये जाणारे कर्मचारी तसेच इतर अभ्यागत यांच्यासाठी या भवनांमध्ये थेट पोहोचण्यासाठी जोडणीची सोय करेल. दैनंदिन पातळीवर सुमारे 60,000 कर्मचारी आणि 2 लाख अभ्यागतांना या जोडणीचा लाभ होईल. जीवनमानातील सुलभतेत वाढ करत या मार्गिका प्रदूषण तसेच जीवाश्म इंधनाचा वापर आणखी कमी करण्यात मदत करतील.

तपशील:

आर.के. आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ हा टप्पा म्हणजे बोटॅनिकल गार्डन- आर.के. आश्रम मार्ग या मार्गिकेचा पुढील विस्तार आहे. या टप्प्यामुळे सध्या पुनर्विकसित होत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा भागाला मेट्रो सेवा पुरवली जाईल. एअरोसिटी ते आयजीडीटी टर्मिनल-1 आणि तुघलकाबाद ते कालिंदी कुंज या मार्गिका एअरोसिटी-तुघलकाबाद मार्गिकेचा विस्तार आहेत आणि त्याराजधानी दिल्लीच्या दक्षिणेकडील तुघलकाबाद, साकेत, कालिंदी कुंज यांसारख्या भागांकडून विमानतळावर पोहोचण्यासाठीच्या सोयीत अधिक भर घालतील. या विस्तारित मार्गांवर 13 स्थानके असतील. यापैकी 10 स्थानके भूमिगत तर 3 स्थानके उन्नत प्रकारची असतील.

या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आर.के.आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (9.913 Kms) ही मार्गिका क्र.1 पश्चिम, उत्तर दिल्ली तसेच जुन्या दिल्लीला मध्यवर्ती दिल्ली भागाशी अधिक चांगल्या प्रकारे जोडेल आणि एअरोसिटी ते आयजीडीटी टी-1 (2.263 kms)आणि तुघलकाबाद ते कालिंदी कुंज (3.9 kms) या इतर दोन मार्गिका दक्षिण दिल्ली भागाला साकेत, छत्तरपूर इत्यादी मार्गे देशांतर्गत विमानतळावरील टर्मिनल 1 शी जोडतील त्यामुळे राष्ट्रीय राजधानीच्या शहरातील संपर्क जोडणी व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

मेट्रोच्या टप्पा – 5 (ए) प्रकल्पाचा विस्तार मध्य दिल्ली आणि आंतरर्देशीय ( देशांतर्गत) विमानतळापर्यंत करण्‍यात आला आहे. दिल्ली मेट्रोचे जाळे विस्तारत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळेल. ‘मॅजेंटा’ मार्गिका आणि गोल्डन मार्गिकेचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांवरील गर्दी कमी होईल, परिणामी मोटार वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.

आर.के. आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ विभाग यामध्‍ये येणारी स्थानके पुढील प्रमाणे आहेत:- आर.के. आश्रम मार्ग, शिवाजी स्टेडियम, मध्‍यवर्ती सचिवालय, कर्तव्य भवन, इंडिया गेट, समर स्मारक - उच्च न्यायालय, बडोदा हाऊस, भारत मंडपम आणि इंद्रप्रस्थ.

तुघलकाबाद – कालिंदी कुंज विभागावरील स्थानके पुढील प्रमाणे असतील - सरिता विहार डेपो, मदनपूर खादर आणि कालिंदी कुंज असतील, तर एरोसिटी स्थानक पुढे आयजीडी टी- 1 स्थानकाला जोडले जाईल.

एकूण अंतर 111 किमी आणि 83 स्थानकांचा समावेश असलेल्या टप्पा – 4 चे बांधकाम सुरू आहे, आणि आजपर्यंत, टप्पा -4 (3 प्राधान्य) कॉरिडॉरचे सुमारे ८०.४३% बांधकाम पूर्ण झाले आहे. टप्‍पा -4 (3 प्राधान्य) कॉरिडॉर डिसेंबर 2026 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आज, दिल्ली मेट्रोची दररोज सरासरी ६५ लाख प्रवाशांना सेवा मिळते. आतापर्यंत नोंदवलेली सर्वाधिक प्रवासी संख्या 08 ऑगस्ट, 2025 रोजी 81.87 लाख आहे. दिल्ली मेट्रो एमआरटीएसच्या मुख्य मापदंडांमध्ये, म्हणजेच वक्तशीरपणा, विश्वसनीयता आणि सुरक्षितता यामध्ये उत्कृष्टतेचा आदर्श घालून दिल्ली मेट्रो आता शहराची जीवनवाहिनी बनली आहे.

सध्या दिल्ली आणि एनसीआर – राजधानी क्षेत्रामध्ये डीएमआरसी द्वारे सुमारे 395 किमी लांबीच्या एकूण 12 मेट्रो मार्गिका आणि 289 स्थानके चालवली जात आहेत. आज, दिल्ली मेट्रोचे जाळे भारतातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क आहे आणि जगातील सर्वात मोठ्या मेट्रोपैकी एक आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208175) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam