पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एलव्हीएम3-एम6 आणि ब्लूबर्ड ब्लॉक-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी अवकाश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे केले अभिनंदन

Posted On: 24 DEC 2025 10:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केलेल्या सर्वात वजनदार उपग्रह एलव्हीएम3-एम6 आणि अमेरिकेच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 या अंतराळयानाचे त्यांच्या इच्छित कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अंतराळ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, असे  मोदी यांनी सांगितले.

"एलव्हीएम3 द्वारे विश्वासार्ह हेवी-लिफ्ट कामगिरी दाखवत, आम्ही गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी पाया मजबूत करत आहोत, व्यावसायिक प्रक्षेपण सेवांचा विस्तार करत आहोत आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ करत आहोत," असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केली आहे:

"भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण प्रगती...

भारतीय भूमीवरून सोडण्यात आलेला सर्वात वजनदार उपग्रह, अमेरिकेचे अंतराळयान, ब्लूबर्ड ब्लॉक-२, यशस्वीरित्या प्रक्षेपित करणे, भारताच्या अंतराळ प्रवासातील एक अभिमानास्पद टप्पा आहे.

हे भारताची हेवी-लिफ्ट प्रक्षेपण क्षमता मजबूत करते आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण बाजारपेठेमध्ये आपली वाढती भूमिका मजबूत करते.

हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आमच्या प्रयत्नांचे देखील प्रतिबिंब आहे. आमच्या मेहनती अवकाश शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन.

भारत अवकाश जगात सतत उंच भरारी घेत आहे!@isro
"भारताच्या तरुणांच्या बळावर, आपला अंतराळ कार्यक्रम अधिक प्रगत आणि प्रभावी होत आहे.

एलव्हीएम3 विश्वसनीय हेवी-लिफ्ट कामगिरी दाखवत असल्याने, आम्ही गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी पाया मजबूत करत आहोत, व्यावसायिक प्रक्षेपण सेवांचा विस्तार करत आहोत आणि जागतिक भागीदारी अधिक खोलवर करत आहोत.

ही वाढलेली क्षमता आणि स्वावलंबनाला चालना येणाऱ्या पिढ्यांसाठी अद्भुत आहे." @isro
***
NehaKulkarni/HemngiKanekar/DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2208023) अभ्यागत कक्ष : 45