गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान, शेतकऱ्यांचे महान नेते आणि भारतरत्न चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 1:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
शेतकऱ्यांचे हितसंबंध जपणारे आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आयुष्य वाहणारे नेते म्हणून चौधरी चरणसिंग यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे शहा यांनी सांगितले. चौधरी चरणसिंग यांचे संपूर्ण जीवन कृषी व्यवस्थेच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित होते, असे त्यांनी नमूद केले.
‘एक्स’ वरील पोस्टमध्ये अमित शहा यांनी म्हटले की, चौधरी चरणसिंग यांनी निर्भयपणे शेतकरी आणि शेतीला प्रशासनाच्या केंद्रस्थानी स्थान दिले. तसेच देशातील आणीबाणी आणि हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असेही त्यांनी अधोरेखित केल.
* * *
नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207678)
आगंतुक पटल : 8