गृह मंत्रालय
आशियाई युवा पॅरा क्रीडास्पर्धा 2025 मध्ये 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 38 कांस्य पदकांची घसघशीत कमाई केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारतीय युवा पॅरा क्रीडापटुंचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 8:33PM by PIB Mumbai
आशियाई युवा पॅरा क्रीडास्पर्धा 2025 मध्ये 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 38 कांस्य पदकांची घसघशीत कमाई केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारतीय युवा पॅरा क्रीडापटुंचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लिहितात, “भारतीय तरुण #AsianYouthParaGames2025! मध्ये झळकले. 36 सुवर्ण, 28 रौप्य आणि 38 कांस्य पदकांसह एकूण 102 पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल आपल्या तरुण पॅरा क्रीडापटुंचे हार्दिक अभिनंदन! या उल्लेखनीय कामगिरीतून या खेळाडूची समर्पण वृत्ती, लवचिकता आणि अढळ प्रेरणा दिसून येते. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत आता क्रीडा प्रतिभेच्या आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या एका जागतिक केंद्राच्या रुपात वेगाने उदयाला येत आहे.या खेळाडूंना भविष्यातल्या कामगिरीसाठी शुभेच्छा !”
***
निलिमा चितळे/संजना चिटणीस/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2206834)
आगंतुक पटल : 8