रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वंदे भारत गाड्यांमध्ये रेल्वेकडून स्थानिक खाद्यपदार्थ सेवा, यामुळे प्रवाशांना मिळणार अधिक समृद्ध अनुभव

प्रविष्टि तिथि: 18 DEC 2025 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025

​भारतीय रेल्वेने, वंदे भारत गाड्यांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांची सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना संस्कृतीशी जोडलेले खाद्यान्न आणि अस्सल स्थानिक चवींचा समृद्ध अनुभव घेण्याची संधी देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील वैविध्यपूर्ण पाककृतींचा वारसा थेट प्रवाशांपर्यंत पोहोचवता येणार असून, यामुळे प्रवाशांना आपल्या आसनांवरच आरामात बसून स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

या सेवेअंतर्गत ​20101/20102 नागपूर–सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना महाराष्ट्रातील कांदे पोहे, तसेच दक्षिण भारतीय दोंडाकाया करम पोडी फ्राय आणि आंध्र प्रदेशातील आंध्र कोडी कुरा यांचा आस्वाद घेता येईल. 20901 MMCT–GNC वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मेथी थेपला आणि 26902 SBIB–VRL वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मसाला लौकी या पदार्थांच्या रुपात गुजराती चवींची मेजवानी अनुभवता येईल. ओदिशाचा आलू फुलकोपी हा पदार्थ 22895 हावडा–पुरी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उपलब्ध असेल.

तर​पांढरा भात, पाचक्का चेरुपायार मेझुक्कू पेराटी, कडला करी, केरळ पराठा, साधे दही आणि पालदा पायसम यासह आप्पम अशा केरळच्या पारंपारिक पक्वानांची मेजवानी, 20633/34 कासारगोड–त्रिवेंद्रम वंदे भारत एक्सप्रेस आणि 20631/32 मंगळुरू–त्रिवेंद्रम वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनुभवता येणार आहे. याशिवाय पश्चिम बंगालचा कोशा पनीर 20872 ROU–HWH वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आणि आलू पोतोल भाजा 22895 HWH–PURI वंदे भारत एक्सप्रेसमध्ये उपलब्ध करून दिला आहे. बिहारचे चंपारण पनीरसारख्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची चव 22349 PNBE–RNC वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चाखता येणार आहे, तर चंपारण चिकनचा आस्वाद 22348 PNBE–HWH वंदे भारत एक्सप्रेसमध्ये घेता येणार आहे.

याशिवाय​अंबल कद्दू आणि जम्मू चना मसाला यासह डोगरी खाद्यपदार्थ 26401–02 आणि 26403–04 गाड्यांमध्ये मिळतील, तर टोमॅटो चमन आणि केशर फिरनी या काश्मिरी पदार्थांची चव 26401/02 आणि 26403/04 SVDK–SINA वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनुभवता येईल.

​22229 CSMT–MAO वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्राचा मसाला उपमा खाता येईल, तर पश्चिम बंगालचा मुरगीर झोल 22302 NJP–HWH वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळेल.

​या उपक्रमाच्या माध्यमातून, भारतीय रेल्वे भारताच्या पाककृतीतील समृद्ध विविधतेचा उत्सव साजरा करत असून, यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास अनुभव अधिक संस्मरणीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारा ठरणार आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2206016) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam