माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसार भारतीने सांस्कृतिक प्रसार वाढवण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी प्रसारण साहित्य पुनर्प्रकाशनाचा मसुदा तयार केला आहे

प्रविष्टि तिथि: 17 DEC 2025 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025

प्रसार भारतीने सांस्कृतिक प्रसार वाढवण्यासाठी आणि प्रसारण मजकूरातून/ साहित्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी, तसेच सार्वजनिक सेवेचे ध्येय जपण्यासाठी, मसुदा कंटेंट सिंडिकेशन धोरण 2025 तयार केले आहे. कंटेंट सिंडिकेशन म्हणजे एखादा लेख, व्हिडिओ, ऑडिओ किंवा प्रसारण साहित्य वेगवेगळ्या संकेतस्थळांवर किंवा प्लॅटफॉर्मवर पुन्हा प्रकाशित करणे. हा मसुदा प्रसार भारतीच्या संकेतस्थळावर सार्वजनिक चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स, टीव्ही प्रसारक, रेडिओ नेटवर्क्स, दूरसंचार कंपन्या, आयपीटीव्ही अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन ऑपरेटर्स आणि कंटेंट अ‍ॅग्रीगेटर्स यांसारख्या मोठ्या भागधारकाशी औपचारिक चर्चा करून प्रसारभारतीने त्यांची मते, गरजा आणि सूचना जाणून घेतल्या.

या धोरणाचा उद्देश दूरदर्शन आणि आकाशवाणी निर्मित प्रसारण मजकूर, राष्ट्रीय व प्रादेशिक संग्रहित प्रसारण मजकूर, तसेच थेट प्रक्षेपण (सरकारी कार्यक्रम, उत्सव, क्रीडा इत्यादी) यातून उत्पन्न मिळवणे हा आहे. यामध्ये प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रकाशित डिजिटल-प्रथम प्रसारण मजकूराचाही विचार करण्यात आला आहे.

याशिवाय या मसुदा धोरणात प्रसार भारतीने पैसे देऊन तयार करून घेतलेला, सह-निर्मित, परवाना घेतलेला आणि प्रसार भारतीच्या मालकीचा इतर प्रसारण मजकूर यांचेही उत्पन्न मिळवण्याचा प्रस्ताव आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्ससोबत धोरणात्मक सहकार्य वाढवण्याची कल्पना मसुदा कंटेंट सिंडिकेशन धोरणात मांडलेली आहे. "यामुळे प्रसार भारतीचे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि भारताची संस्कृती जगभरात ठसठशीतपणे दिसून येईल."

या धोरणात वेगवेगळ्या प्रकारचे परवाना मॉडेल्स सुचवले आहेत – कधी ठरावीक फी घेणे, कधी मिळालेल्या उत्पन्नातला हिस्सा वाटून घेणे, तर कधी किमान हमी रक्कम मिळवून त्यासोबत उत्पन्नातला हिस्सा घेणे.

माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. सेल्वगणपती टी.एम. यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.


सुषमा काणे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2205452) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Tamil , Telugu , Kannada , Malayalam