पंतप्रधान कार्यालय
जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 11:48PM by PIB Mumbai
महामहीम,
माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे स्नेहपूर्ण स्वागत केल्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आपले मनःपूर्वक आभार मानतो.भारत आणि जॉर्डन यांच्यातले संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी आपण अतिशय सकारात्मक कल्पना मांडल्या आहेत.आपली मैत्री आणि भारताप्रती कटिबद्धता यासाठी मी आपले हार्दिक आभार मानतो.
यावर्षी आपण दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहोत.हा टप्पा आपल्याला येत्या वर्षांसाठी नव्या उर्जेने आगेकूच करण्यासाठी प्रेरित करत राहील. आजची बैठक आपले संबंध अधिक दृढ करेल आणि त्यांना नवी गतीही देईल याचा मला पूर्ण विश्वास आहे.व्यापार,खते,डिजिटल तंत्रज्ञान,पायाभूत सुविधा आणि उभय देशांतल्या लोकांमधले संबंध यासारख्या क्षेत्रात आपले सहकार्य आपण अधिक वृद्धिंगत करू.
महामहीम,
जागतिक स्तरावरही आपण परस्परांच्या घनिष्ट संपर्कात आहोत.गाझामध्ये सुरवातीपासूनच आपली अतिशय सक्रीय आणि सकारात्मक भूमिका राहिली आहे. या क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य नांदेल अशी आमची सर्वांची आशा आहे. दहशतवादाविरोधात आमची स्पष्ट आणि सामायिक भूमिका आहे. आपल्या नेतृत्वाखाली जॉर्डनने, दहशतवादाविरोधात, कट्टरतेविरोधात मानव जगताला खंबीर आणि धोरणात्मक संदेश दिला आहे. मर्यादित सत्रात या अतिशय महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यावर आम्ही चर्चा केली.2018 मध्ये आपल्या भारत भेटीदरम्यान इस्लामिक वारसा याविषयीच्या परिषदेत आपण सहभागी झालो होतो.2015 मध्ये हिंसक कट्टरतावादाविरोधात लक्ष केंद्रित करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपली पहिली भेट झाली होती त्याचे मी स्मरण करतो. त्यावेळीही आपण या विषयावर प्रेरक वक्तव्य केले होते. संयमाला प्रोत्साहन देण्याचे आपले प्रयत्न केवळ प्रादेशिक शांततेसाठीच नव्हे तर जागतिक शांततेसाठीही अतिशय महत्वाचे आहेत.या दिशेने आपण ठामपणे वाटचाल जारी राखू. आपल्या परस्पर सहकार्याचे इतर सर्व आयाम आपण अधिक बळकट करू.आपल्या आदरातिथ्याबद्दल मी आपले आणि जॉर्डनच्या जनतेचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.
***
JaideviPujariSwami/NilimaChitale/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205016)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam