गृह मंत्रालय
राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आणि मजबूत भारताचे शिल्पकार असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पटेल यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 2:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आणि मजबूत भारताचे शिल्पकार असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात अमित शाह म्हणतात की अगणित प्रकारच्या प्रतिकूल बाबी असूनही सरदार पटेल यांनी विखुरलेल्या स्वातंत्र्य भारताला एकत्र आणून त्याला एका सशक्त देशाचा मजबूत पाया दिला. ते म्हणाले की स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार पटेल यांनी भारतमातेचे संरक्षण, अंतर्गत स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्याला त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनवले. सहकारी चळवळीच्या नवसंजीवनीला प्रेरणा देणारे तसेच महिला आणि शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणाद्वारे आत्मनिर्भर भारताचा पाया घालणारे सरदार पटेल आपल्याला राष्ट्र सर्वप्रथम ठेवण्याच्या मार्गावर दिशादर्शक ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करत राहतील.
जयदेवी पुजारी-स्वामी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204029)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam