पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

COP-28 मधील उद्योग संक्रमण नेतृत्व गटाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2023 10:29PM by PIB Mumbai

 

उपस्थित मान्यवर,

उद्योग क्षेत्रातील नेते,

प्रतिष्ठित पाहुणे,

आपल्या सर्वांना माझा नमस्कार.

ग्लोबल नेट झिरो,या समान वचनबद्धतेने आपण सर्वजण जोडले गेलो आहोत. नेट झिरोची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे.

तसेच, औद्योगिक क्षेत्रातील नवोपक्रम हा एक महत्त्त्वाचा घटक आहे.

उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गट, म्हणजेच लीड-आयटी, पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्याचे एक यशस्वी उदाहरण आहे.

लीड-आयटी यांचा आरंभ 2019 मध्ये  झाला असून  उद्योग संक्रमणाला बळकटी देण्यासाठी केलेला हा आमचा संयुक्त प्रयत्न आहे.

कमी कार्बन उत्सर्जनासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांना गती दिली पाहिजे. तसेच ते शक्य तितक्या लवकर आणि सहजपणे जगाच्या ग्लोबल साऊथ कडे पोहोचवले पाहिजे. पहिल्या टप्प्यात, लीड-आयटीने लोह आणि पोलाद, सिमेंट, ॲल्युमिनियम, वाहतूक यासारख्या क्षेत्रातील संक्रमणाची चौकट आणि ज्ञानाचे  सामायिकरणावर यावर लक्ष केंद्रित केले होते. आज 10 देश आणि 20 कंपन्या या गटाचे सदस्य आहेत.

मित्रांनो,

भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात चक्रीय धोरणांवर आधारित जागतिक सहकार्यावर भर दिला आहे.

आज ते पुढे नेत, आम्ही लीड-आयटीमध्ये एक नवा अध्याय सुरु करत आहोत.

आज आम्ही लीड-आयटीच्या (Lead-IT 2.0) दुसऱ्या टप्प्याची  सुरूवात करत आहोत.

या टप्प्यात तीन प्रमुख उद्दिष्टे असतील. पहिले, समावेशक आणि न्याय्य उद्योग संक्रमण. दुसरे, कमी कार्बन तंत्रज्ञानातील विकास-सहकार्य आणि हस्तांतरण. आणि तिसरे, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये उद्योग संक्रमणासाठी आर्थिक सहाय्य देणे.

हे सर्व घडवून  आणण्यासाठी, भारत-स्वीडन उद्योग संक्रमण मंच देखील सुरू केला जात आहे.

या व्यासपीठाचा उद्देश दोन्ही देशांचे सरकार, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंतांना जोडणे हा आहे. मला आशा आहे की आमचे हे एकत्रित प्रयत्न भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणासाठी पर्यावरणपूरक हिरव्या विकासाची एक नवीन हकिकत प्रभावीपणे तयार करतील.

पुन्हा एकदा, मी माझे मित्र आणि सह-आयोजक, स्वीडनचे पंतप्रधान महामहिम उल्फ क्रिस्टरसन आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो.

धन्यवाद.

अस्विकरण - हा पंतप्रधानांच्या प्रसिद्धिपत्रकाचा अनुवाद  आहे. मूळ प्रसिद्धिपत्रक हिंदीमध्ये प्रसिद्ध  झाले होते.

***

आशिष सांगळे / संपदा पटगावकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2203094) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Malayalam , Manipuri , Telugu , English , Urdu , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada