पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्त्री शक्तीला केले अभिवादन
नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे प्राप्त झालेली ऊर्जा अमृतकालच्या संकल्पांना अधिक बळकटी देणार : पंतप्रधानांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2023 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री शक्तीला अभिवादन केले आहे आणि म्हटले आहे, की ते बाबा विश्वनाथांच्या काशी नगरीत जिथे जिथे गेले तिथे तिथे माता, बहिणी आणि मुलींचा उत्साह पाहून ते भारावून गेले. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे त्यांच्यातील ऊर्जा अमृतकालाच्या संकल्पांना आणखी बळकटी देणार आहे, असे मोदी यांनी पुढे नमूद केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“नारी शक्तिला माझा प्रणाम!
“बाबा विश्वनाथांच्या काशी नगरीत जिथे गेलो तेथील माता, बहिणी आणि मुलींचा उत्साह पाहून भारावून गेलो. नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे आमच्या परीवारातील महिलांच्या अंतर्गत असलेली ऊर्जा अमृतकालाच्या संकल्पांना अधिक बळकटी देणार आहे”
* * *
आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202222)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam