पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांना इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दूरध्वनी


उभय नेत्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर केली चर्चा

उभय नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुतेच्या दृष्टिकोनाचा केला पुनरुच्चार

प्रदेशातील न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याची पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा दिली ग्वाही

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2025 10:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

उभय नेत्यांनी भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारीतील सातत्यपूर्ण गतिशीलतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि परस्पर फायद्यासाठी हे संबंध आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

उभय नेत्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला तसेच सर्व प्रकारच्या आणि स्वरुपाच्या दहशतवादाबद्दल शून्य-सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार केला. 

त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवरही विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी गाझा शांतता योजनेच्या लवकर अंमलबजावणीसह या प्रदेशात न्याय्य आणि शाश्वत शांततेच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

उभय नेत्यांनी परस्पर संपर्कात राहण्याचे मान्य केले.

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2201971) आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada