पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त

Posted On: 07 DEC 2025 10:58AM by PIB Mumbai

 

 

आज पंतप्रधानांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

ते म्हणाले की सशस्त्र दलाच्या जवानांचे शिस्तबद्ध वर्तन, दृढनिश्चय आणि अदम्य जिद्द राष्ट्राचे संरक्षण करतात आणि देशवासीयांना सबळ करतात. त्यांनी नमूद केले, त्यांची निष्ठा ही कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे उज्ज्वल उदाहरण आहे.

सशस्त्र दलाच्या पराक्रम आणि सेवेचा सन्मान म्हणून सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

पंतप्रधानांनी समाज माध्यम X वर लिहिले:

"सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त, आपल्या राष्ट्राचे संरक्षण अविचल धैर्याने करणाऱ्या सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांची शिस्त, दृढनिश्चय आणि जिद्द आपल्या जनतेचे संरक्षण करतात आणि आपल्या राष्ट्राला बळकटी देतात. त्यांची बांधिलकी ही कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेचे प्रभावी उदाहरण आहे. चला, आपण सशस्त्र सेना ध्वज दिन निधीतही योगदान देऊया."

****

हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2199984) अभ्यागत कक्ष : 44