पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त
पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 7:08AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.
पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी या दुर्घटनेबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. राज्य सरकार या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क माध्यम X वर पोस्ट केले आहे;
“गोवा, अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत. या स्थितीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकार प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे. तसेच पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना ₹ 2 लाख आणि जखमींना ₹ 50,000 इतके अनुदान जाहीर केले आहे.”
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे;
“अर्पोरा, गोवा येथील दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ मधून ₹ 2 lakh इतके अनुदान दिले जाणार आहे. जखमींना Rs. 50,000 दिले जातील: PM @narendramodi”
***
हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2199958)
आगंतुक पटल : 33