पंतप्रधान कार्यालय
गीता जयंतीच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या अवतरणाशी संबंधित 'गीता जयंती'च्या पवित्र दिनानिमित्त देशभरातील सर्व परिवार सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कर्तव्यपूर्तीच्या अमूल्य संदेशांनी सुशोभित या दिव्य ग्रंथाचे भारतीय कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात अत्यंत विशिष्ट स्थान आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. "यातील दिव्य श्लोक प्रत्येक पिढीला निःस्वार्थ कर्मासाठी प्रेरणा देत राहतील", असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"देशभरातील माझ्या परिवारातील बांधवांना श्रीमद्भगवद्गीतेच्या अवतरणाशी संबंधित पवित्र दिन 'गीता जयंती'च्या मनःपूर्वक शुभेच्छा. कर्तव्यपालनाच्या अनमोल संदेशांनी सुशोभित या दिव्य ग्रंथाला भारतीय कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्थान लाभले आहे. त्यातील दिव्य श्लोक प्रत्येक पिढीला निष्काम कर्मासाठी प्रेरित करत राहतील. जय श्री कृष्ण!"
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197120)
आगंतुक पटल : 4