पंतप्रधान कार्यालय
दृष्टीबाधित महिला टी20 विश्वकरंडक विजेत्या संघाशी पंतप्रधानांचा संवाद
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2025
खेळाडू- सर, ती गाते हे तुम्हाला कसे कळले?
पंतप्रधान- मला तुम्हां सर्वांची माहिती आहे.
खेळाडू- सर, आपल्याशी बोलल्यानंतर मी पूर्णपणे समाधानी आहे.
पंतप्रधान- समाधानी.
पंतप्रधान- तुम्ही खूप मेहनती लोक आहात. तुम्ही स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
पंतप्रधान- प्रत्येकाची स्वाक्षरी आहे ?
खेळाडू- हो, सर.
पंतप्रधान- यावर स्वाक्षरी करायची आहे.
खेळाडू- हो, सर.
पंतप्रधान- वंदे मातरम् ला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत.
खेळाडू- हो, सर.
पंतप्रधान- महणून मी वंदे मातरम् असे लिहिले आहे.
पंतप्रधान- आम्ही ऐकले की तुम्ही खूप चांगल्या गाता?
खेळाडू- हो, सर. गंगाधरा शंकरा करूणा करा, मामव भवसागर तारका, भो शंभू, शिव शंभू स्वयंभू।
पंतप्रधान- वा! तुम्हांला माहित आहे मी काशीचा खासदार आहे, म्हणून तुम्हांला शंभूची आठवण आली.
खेळाडू- हो, सर.
खेळाडू- सर, आमच्या संघातील आम्ही सर्वच अष्टपैलू खेळाडू आहोत.
पंतप्रधान- अच्छा, प्रत्येकजण, हे राजकारणासारखे झाले. राजकारणातील प्रत्येक जण अष्टपैलू असतो. कधी एखादा मंत्री होतो, एखादा आमदार होतो, कधी खासदार होतो.
पंतप्रधान- जय जगन्नाथ!
खेळाडू- जय जग्गनाथ. मी मोदी सरांसमवेत छायाचित्र काढायला गेले होते आणि तुम्ही गाता का? त्यांनी अचानक विचारले, "सरांना कसे माहीत?" मला कळले नाही आणि एका क्षणासाठी मी स्तब्ध झाले.
पंतप्रधान- काव्या, तुम्ही आधी या.
खेळाडू- धन्यवाद.
खेळाडू- सर, तुम्हांला कसे कळले की ती गाते?
पंतप्रधान- असे आहे की, मी तुम्हा सर्वांची माहिती घेतली आहे .
खेळाडू- माझ्या वडिलांचे एक मोठे स्वप्न होते. त्यांनाही ते खूप आवडायचे. पण माझे वडील आता इथे नाहीत, पण जर माझ्या वडिलांनी हे पाहिले असते तर, त्यांना खूप आनंद झाला असता.
पंतप्रधान- याचा अर्थ खाण्यासाठी इतकेच पदार्थ आहेत असे नाही, आणखीही आहे. चला हे जम्मू -काश्मीरला खिलवूया, जो अष्टपैलू आहे. हा मध्य प्रदेश आहे.
खेळाडू- संपूर्ण गावात ते लोक बोलतात, तुम्ही दृष्टिबाधित आहात, तुम्ही काय करता? तुम्ही काहीही करत नाही. तसे सगळेच बोलतात. आणि आमचे पालक त्या लोकांशी बोलतात आणि त्यांना वाईटही वाटते.
पंतप्रधान- आता तर गावकऱ्यांनी उलट बोलणे सुरू केले असेल?
खेळाडू- हो सर. हो सर. त्यांच्या हातून पहिल्यांदा आम्ही मिठाई खाल्ली तेव्हा खूप छान वाटले. म्हणजे ती एक छान भावना होती, मी काही बोलू शकत नाही. माझे एक स्वप्न होते, माझे स्वप्न पूर्ण झाले.
पंतप्रधान- दीपिका आता सुरुवात कर बेटा. हे आवडत नाही का?
खेळाडू- आवडते.
पंतप्रधान- फक्त मिठाई खातेस.
खेळाडू- सर, तुमच्याशी बोलल्यावर माझे पोट भरले.
पंतप्रधान- पोट भरले.
पंतप्रधान- ज्या व्यक्ती परिश्रम करून पुढे येतात, त्यांची मेहनत कधीही वाया जात नाही. केवळ खेळाच्या मैदानातच नव्हे तर आयुष्यातही. तुम्ही लोक कठोर परिश्रमाने पुढे आला आहात. आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच आता पहा तुमचा आत्मविश्वासही खूप वाढला आहे.
खेळाडू - हो सर.
पंतप्रधान- पूर्वी गावात शिक्षकांशी बोलायचे असेल तेव्हाही तुम्ही विचार करत असाल की बोल की नको बोलू? आणि आज तर तुम्ही पंतप्रधानांशी बोलत आहात.
खेळाडू- हो सर. तुम्ही आमच्याशी खूप छान बोलत आहात, आम्ही सगळे मोकळेपणाने... बोलावे असे वाटते आहे.
पंतप्रधान- तुम्ही सगळे माझे आहात, तेव्हा मी असेच बोलणार.
खेळाडू- त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा जो खेळ आहे, तो चांगली प्रगती करत आहे. ते प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. अनेक संघ खूप पुढे जात आहेत.
पंतप्रधान- जेव्हा तुम्हा सर्वांना भेटतो, तेव्हा मलाही वाटते की वा, आपला देश किती प्रगती करतो आहे, ही मुले किती धाडसी आहेत. जसे आपण निवडणूक लढवतो आहोत.
खेळाडू- हो सर.
पंतप्रधान- प्रतिस्पर्ध्याचा जामीन जप्त होतो, अनामत रक्कम जप्त होते, तेव्हा लोक म्हणतात की, कसले लोक आहात त्याचा जामीनही गिळलात. या वेळी तुम्ही खेळात एखाद्याला 10 षटकांत परत पाठवून दिलेत.
खेळाडू- सर, मी तीन षटकांतच पाठवले होते.
पंतप्रधान- मग, इतका दुष्टपणा का करता तुम्ही? चला, सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशाचे नाव उंचावलेत, आणि देशातील सर्वांनाच यामधून प्रेरणा मिळणार आहे.
खेळाड- हो सर.
खेळाडू- धन्यवाद सर
पंतप्रधान- आणि केवळ दिव्यांगानाच नव्हे तर इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे.
* * *
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवे/दर्शना राणे
(रिलीज़ आईडी: 2196274)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada