इफ्फी 2025 मध्ये त्रिबेनी राय यांच्या ‘शेप ऑफ मोमोज’ या चित्रपटात सिक्कीममधील दैनंदिन जनजीवनाचे चित्रण केंद्रस्थानी
सिक्कीमच्या चित्रपट निर्मात्या त्रिबेणी राय यांनी त्यांच्या राज्यातील उभरत्या चित्रपट उद्योगा'तील आव्हानांवर टाकला प्रकाशझोत
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
सिक्कीमच्या चित्रपट निर्मात्या त्रिबेणी राय यांचा पहिलाच संवेदनशील 'शेप ऑफ मोमोज' हा चित्रपट, गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत दाखवण्यात आला. या प्रदर्शनानंतर, दिग्दर्शक त्रिबेणी राय, निर्माती आणि सह-लेखिका किसले आणि मुख्य अभिनेत्री गौमाया गुरुंग यांनी इफ्फी येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट या संस्थेची माजी विद्यार्थिनी असलेल्या, त्रिबेणी राय या पूर्व हिमालयाच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक प्रदेशातील महिलांच्या अनुभवांच्या संवेदनशील चित्रदर्शी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात.’शेप ऑफ मोमोज,’ हा त्यांचा पहिलाच वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे, ज्यात सिक्कीमच्या सांस्कृतिक भूप्रदेशात रुजलेली कथा सादर केली आहे, आणि हाच विषय चित्रपटातून येतो.
आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना, त्रिबेनी यांनी ही प्रक्रिया आव्हानात्मक तथापि खूप आनंददायी असल्याचे म्हटले आहे. सिक्कीम चित्रपट उद्योग अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने, या प्रदेशातील चित्रपट निर्मितीला पायाभूत सुविधांच्या मर्यादा येतात - अगदी व्यावसायिक कॅमेरा साधने देखील कोलकाता, काठमांडू किंवा गुवाहाटी सारख्या शहरांमधून मिळवावी लागतात. या अडथळ्यांना न जुमानता, शेप ऑफ मोमोजने आधीच बुसानसह अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून आपले सादरीकरण केले आहे. हा अनुभव त्यांनी "तृप्त करणारा आहे",असे त्याचे वर्णन केले आहे.
त्रिबेणी राय म्हणाल्या की चित्रपटाचे शीर्षक सिक्कीममधील मोमोजच्या सांस्कृतिक व्यापकतेवरून घेतले आहे - लग्नापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व प्रसंगी बनवले जाणारे हे अन्न आहे. "हे मी ज्या समाजामधून येते, त्या समाजातील लोकांचे दैनंदिन जीवन आणि भावनांचे प्रतिनिधित्व करणारे आहे," असे त्यांनी नमूद केले.
स्वतंत्र आवाज, सामायिक दृष्टीकोन
निर्मात्या आणि सह-लेखिका किसले, ज्या स्वतः चित्रपट स्कूलच्या पदवीधर आहेत, त्यांनी त्रिबेनीच्या पहिल्या मसुद्यात अंतर्भूत असलेल्या सत्यप्रियतेचे कौतुक केले, जे त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. सिक्कीमसारख्या प्रदेशांतील चित्रपटांचे प्रतिनिधित्व नेहमीच कमी असते किंवा मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपटांमध्ये सखोल रूढींद्वारे सादर केले जात नाही, यावर त्यांनी भर दिला. "अशा कथा प्रकाशात आल्या पाहिजेत," असे त्या म्हणाल्या.इफ्फीमध्ये झालेली त्यांची निवड "खूप लाभदायक" वाटते - असे सांगत त्या म्हणाल्या, की हे त्यांनी चित्रपट निर्मितीच्या विद्यार्थी काळापासूनच जोपासलेले स्वप्न आहे.”
नेपाळी भाषेतून चित्रपटांमधील स्त्री दृष्टिकोन
मुख्य अभिनेत्री गौमाया गुरुंग हिने पाच वर्षांच्या अनुभवानंतरही, नेपाळी चित्रपट उद्योगात दुर्मिळ असलेल्या स्त्री दृष्टिकोनातून दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटाचा आपण भाग असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तिने चित्रपटात नायिकेच्या अंतर्मनातील जगाचे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ चित्रण करण्यासाठी दाखविलेल्या दृष्टिकोनाचे मिश्रण केल्याबद्दल प्रशंसा केली.
वितरणातील आव्हाने आणि समुदाय उभारणी
या प्रदेशातील चित्रपटांचे वितरण आणि विपणन स्वतंत्रपणे करण्याच्या आव्हानांवर टीमने एकवाक्यता दर्शविली. शेप ऑफ मोमोज हा चित्रपट सिक्कीम, उत्तर बंगाल, मेघालय आसामच्या काही भागात आणि देहरादून येथे - जिथे नेपाळी भाषिक प्रेक्षक जास्त आहेत - तेथे प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त, त्रिबेनीने खुलासा केला की हा चित्रपट इटलीमध्येही चित्रपटगृहातून प्रदर्शित होईल.
वितरण आणि दृश्यमानतेतील अडथळे दूर करण्यासाठी सिक्कीममध्ये समान विचारसरणीच्या स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांच्या सहाय्यक नेटवर्कची वाढती गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सिक्कीमच्या नवोदित चित्रपट संस्कृतीसाठी एक मैलाचा दगड
सिक्कीममधील पहिल्या महिला चित्रपट निर्मात्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिबेणी राय यांनी राज्यातील चित्रपट संस्कृतीच्या हळूहळू होत जाणाऱ्या उदयावर भाष्य केले. मर्यादित प्रवेश, संसाधने आणि पायाभूत सुविधांसह, चित्रपट निर्मिती हा एक आव्हानात्मक व्यवसाय आहे. तरीही, सिक्कीमच्या तरुण चित्रपट विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत असलेल्या वाढत्या उत्साहाची त्यांनी नोंद घेतली;ज्यांपैकी बरेच जण ‘शेप ऑफ मोमोज’मधील दैनंदिन जीवनाचे चित्रण पाहून आनंदित झाले आहेत.
मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटांमध्ये आणि काही वेब मालिकांमध्येही, ईशान्येला अनेकदा परदेशी समजले जाते किंवा अंमली पदार्थांशी संबंधित कथांच्या दृष्टिकोनातून चित्रित केले जाते, असे सांगत त्रिबेणी राय पुढे म्हणाल्या, "मला अशी कथा सांगायची होती जिथे सिक्कीममधील सामान्य लोक केंद्रस्थानी असतील - जिथे आपण स्वतःच्या या कथांचे नायक आहोत."

इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Post Link: https://x.com/PIB_Panaji/status/1991438887512850647?s=20
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195928
| Visitor Counter:
4