गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफ्लिंपिक्स 2025 मध्ये भारताने 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह 20 पदकांची कमाई केल्याबद्दल भारतीय संघाचे केले अभिनंदन
Posted On:
27 NOV 2025 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफ्लिंपिक्स 2025 मध्ये भारताने 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह 20 पदके जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे,
“आपल्या डेफ्लिम्पियन्सनी क्रीडा प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफ्लिंपिक्स 2025 मध्ये भारतीय संघाने 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह 20 पदके जिंकल्याच्या विलक्षण यशाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या असामान्य यशाने आपल्या खेळाडूंमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. तुम्हा सर्वांना भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.”
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195553)
Visitor Counter : 10