पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनात झाले सहभागी
Posted On:
26 NOV 2025 9:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025
संविधान दिनानिमित्त, आज दिवसाच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा; पंतप्रधानांचे प्रधान सचिव-2 शक्तिकांत दास; पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर; आणि पंतप्रधानांचे विशेष सचिव अतिश चंद्रा यांच्यासह पंतप्रधान कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.
पीएमओ इंडिया हँडलने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की:
“आज, संविधान दिनानिमित्त, पंतप्रधान कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव-2 शक्तिकांत दास, पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर, पंतप्रधानांचे विशेष सचिव अतिश चंद्रा यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.”
* * *
सोनाली काकडे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195194)
Visitor Counter : 5